शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘एमआरआय’च्या तुटवड्यावर उतारा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 02:13 IST

अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न असलेल्या सवरेपचार रुग्णालयात ‘एमआरआय’ मशीन उपलब्ध नसल्यामुळे गरजू रुग्णांची हेळसांड होऊ नये, यासाठी आता पात्र लाभार्थींची तपासणी महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत खासगी रुग्णालयांमधून करून घेतली जाणार असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. खासगी इस्पितळांमधून एमआरआय करवून घेण्यासाठी रुग्ण हा महात्मा फुले जनआरोग्य योजनेसाठी पात्र असला पाहिजे, शिवाय त्याला खरोखरच ‘एमआरआय’ करणे गरजेचे असले पाहिजे, अशी अट घालण्यात आली आहे.

ठळक मुद्दे‘सवरेपचार’ला प्रतीक्षाचपात्र लाभार्थींना खासगी इस्पितळातून देणार लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न असलेल्या सवरेपचार रुग्णालयात ‘एमआरआय’ मशीन उपलब्ध नसल्यामुळे गरजू रुग्णांची हेळसांड होऊ नये, यासाठी आता पात्र लाभार्थींची तपासणी महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत खासगी रुग्णालयांमधून करून घेतली जाणार असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. खासगी इस्पितळांमधून एमआरआय करवून घेण्यासाठी रुग्ण हा महात्मा फुले जनआरोग्य योजनेसाठी पात्र असला पाहिजे, शिवाय त्याला खरोखरच ‘एमआरआय’ करणे गरजेचे असले पाहिजे, अशी अट घालण्यात आली आहे.येथील सवरेपचार रुग्णालयात जिल्हाभरातून व लगतच्या जिल्हय़ांमधूनही मोठय़ा संख्येने रुग्ण उपचारासाठी येतात. येथे जवळपास सर्वच अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत. सिटी स्कॅन, एक्स-रे, सोनोग्राफी अशा सुविधा उपलब्ध असल्या, तरी एवढय़ा मोठय़ा रुग्णालयात ‘एमआरआय’ मशीन मात्र उपलब्ध नाही. दोन वर्षांपूर्वी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सवरेपचारमध्ये लवकरच एमआरआय मशीन येणार असल्याची घोषणा केली होती. यासाठी मुंबई येथील सिद्धिविनायक ट्रस्टकडून निधीही मंजूर झाला होता; परंतु अद्यापपर्यंत येथे एमआरआय मशीन आली नाही. त्यामुळे येथे येणार्‍या गरजू रुग्णांना नाइलाजाने खासगी रुग्णालयांमध्ये रक्कम मोजून एमआरआय स्कॅन करवून घ्यावे लागते. गरीब घरातील रुग्णांना एमआरआयचा खर्च परवडणारा नसल्यामुळे अनेकदा त्यांच्या आजाराचे निदान होत नाही. यासाठी आता एमआरआय स्कॅन करवून घेण्याची गरज असलेल्या पात्र लाभार्थींना महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत खासगी इस्पितळांमध्ये ‘रेफर’ करून तेथे मोफत एमआरआय स्कॅन करवून घेतल्या जाईल, असे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी शनिवारी आमदार बच्चू कडू यांच्याशी चर्चा करताना स्पष्ट केले. हा लाभ घेण्यासाठी रुग्ण हा महात्मा फुले जनआरोग्य योजनेसाठी पात्र असणे गरजेचे आहे.

सवरेपचारमध्ये एमआरआय मशीन उपलब्ध होईपर्यंत येथे येणार्‍या पात्र लाभार्थींना आम्ही एमआरआय स्कॅनसाठी खासगी रुग्णालयांमध्ये ‘रेफर’ करू. यासाठी त्यांना म. फुले जनआरोग्य योजनेचा लाभ दिला जाईल. - डॉ. राजेश कार्यकर्ते, वैद्यकीय अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.-