शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

मृतक महिलेची सही करून बनविले बनावट संमती पत्र

By admin | Updated: July 9, 2014 00:33 IST

पतीने मृतक झालेल्या पत्नीची बनावट स्वाक्षरी करू न विहिरीसाठी संमती पत्र तयार केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.

अकोला : पातूर तालुक्यातील पिंपळडोळी येथील एका बहाद्दर पतीने मृतक झालेल्या पत्नीची बनावट स्वाक्षरी करू न विहिरीसाठी संमती पत्र तयार केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश पातूरचे न्यायाधीश पी.एम.बडिगी यांनी दिले. अजय जयवंत देशमुख यांनी न्यायालयात दाखल केलेल्या तक्रारीत अनिल यशवंत देशमुख, प्रमोद प्रीतम खुळे, मंगलचंद सुहालाल जैन व शामसिंग कन्हीराम चव्हाण यांना प्रतिवादी केले आहे. अनिल देशमुख यांनी त्यांच्या मालकीचे शेत २00१ मध्ये प्रमोद खुळे यांना विकले होते. यावेळी खरेदीखतामध्ये विहिरीचा कोणताही उल्लेख नव्हता. ही विहीर वडिलोपाजिर्त असल्यामुळे अजय देशमुख यांनी या विहिरीवर दावा केला आहे. या शेतीविषयी आपली बाजू सुरक्षित व्हावी म्हणून अनिल देशमुख यांनी १२ जून २00३ रोजी खुळे यांना विहीर खरेदी करू न देण्यासाठी संमती लेख तयार केला. या संमती लेखावर अनिल देशमुख व यांची पत्नी विजया अनिल देशमुख यांची स्वाक्षरी आहे. या व्यवहारासाठी उपयोगात आणण्यात आलेल्या मुद्रांकाचा क्रमांक ३३५४ असा असून, तो १२ जून२00३ रोजी विजया देशमुख व अनिल देशमुख यांच्या नावाने खरेदी केलेला असून, तो पातूर उपकोषागार कार्यालयाचा आहे. यातील धक्कादायक बाब म्हणजे विजया देशमुख ५ नोव्हेंबर १९८२ रोजीच मयत झालेल्या आहेत. सन २00३ मध्ये झालेल्या संमती लेखावर विजया देशमुख म्हणून सही कोणत्या महिलेने केली, हा प्रश्न निर्माण झाला आहे. मयताचा दाखला व बनावट संमती लेख हे दोन्ही दस्ताऐवजासह अजय देशमुख यांनी १४ मे २0१४ रोजी चान्नी पोलिस ठाण्यात तक्रार केली होती; मात्र पोलिसांनी दखल न घेतल्याने अजय देशमुख यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. पातूर न्यायालयाने सदरहू प्रकरणात १२0 ब कट रचणे, ४0६, ४१७,४२0,४६८,४७१ ३४ अन्वये गुन्हे दाखल करण्याचे आदेश देऊन एक महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचे सांगितले.या प्रकरणात अर्जदाराच्यावतीने अँड. राजेश जाधव व अँड. मिश्रा यांनी काम पाहिले.