शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

अकोल्यातल्या पोरींची कुस्ती

By admin | Updated: August 29, 2016 01:22 IST

सुनीता कडोळे महाराष्ट्र राज्यातील पहिल्या महिला कुस्ती प्रशिक्षक.

अकोला, दि. २८: पुरुषांची मक्तेदारी असलेल्या कुस्ती स्पर्धेत साक्षी मलिकनं अद्वितीय कामगिरी करीत चमत्कारच केला. रिओ ऑलिम्पिकमध्ये देशाला पहिलं पदक साक्षीनं मिळवून दिलं. हरियाणातल्या रोहतकची असलेल्या साक्षीमुळे आज देशाच्या कानाकोपर्‍यातल्या मुली कुस्तीकडे वळत आहेत. साक्षीसारख्याच अनेक मुली उत्साहाने आखाड्यात उतरत आहेत. अकोल्यासारख्या छोट्या शहरातदेखील अनेक महिला कुस्तीपटू आहेत. सुनीता कडोळे या तर महाराष्ट्र राज्यातील पहिल्या महिला कुस्ती प्रशिक्षक आहेत. सुनीता कडोळे यांनी स्वत:च्या मुलीलादेखील कुस्तीगीर केले. आज अकोल्यातल्या ४५ महिला कुस्तीगिरांनी राज्य व राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळविला आहे.सुनीता मोरेश्‍वर कडोळे यांनी सर्वप्रथम अकोल्यात महिलांकरिता कुस्तीची सुरुवात केली. त्यांनी विदर्भ केसरी कुस्ती स्पर्धेत सन २00७ मध्ये पहिले सुवर्ण पदक पटकाविले. त्यानंतर २00९ मधील विदर्भ केसरी स्पर्धेतदेखील सुवर्ण पदक पटकाविले. तसेच विदर्भस्तरीय कुस्ती स्पर्धेत चार रौप्य पदकं मिळविली. श्री मोरेश्‍वर महिला कुस्ती संस्थेची स्थापना करू न त्याअंतर्गत अनेक मुलींना कुस्तीचे प्रशिक्षण दिले. संस्थेच्या संघाने नागपूर आणि देवळी (वर्धा) येथे झालेल्या विदर्भ केसरी स्पर्धेत द्वितीय क्रमांकाची चॅम्पियन ट्रॉफी मिळविली. सुनीताताईंनी महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत ८ वेळा अकोला जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. दोन वेळा खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धा खेळल्या. या स्पर्धेत संस्थेच्या महिला कुस्तीगिरांनी उत्कृष्ट खेळप्रदर्शन करीत तृतीय क्रमांकाची चॅम्पियन ट्रॉफी पटकाविली. यानंतर सुनीताताईंनी आपली मुलगी माधुरी हिला कुस्तीचे धडे देण्यास सुरुवात केली. दोघी मायलेकी महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा असो की विदर्भ कुस्ती स्पर्धा. एकाच स्पर्धेत एकाच मॅटवर खेळत असत. मायलेकींची कुस्ती बघण्यासाठी स्टेडिअमवर खचाखच गर्दी होत असे. बक्षीसही भरपूर मिळायचे. मायलेकी कुस्तीपटू म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाल्या. या दोघींची प्रसिद्धी बघून इतर महिलादेखील कुस्ती शिकण्यासाठी सुनीताताईंच्या तालीम संघात येऊ लागल्या. त्यांच्या तालमीतील महिला कुस्तीपटूंनी शालेयस्तर स्पर्धेत २५ पदके पटकाविली. अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत खेळप्रदर्शन करीत आठ मुलींनी कलरकोट प्राप्त केले. नॅशनल कॅडेट कुस्ती स्पर्धेतही संस्थेच्या प्रशिक्षणार्थींनी उत्तम खेळप्रदर्शन केले. पायका (ग्रामीण) कुस्ती स्पर्धेत तीन वेळा उत्कृष्ट खेळप्रदर्शन केले. यामध्ये सुनीताताईंची मुलगी माधुरी हिने राज्य स्तरावर कांस्य पदक पटकाविले. आज संस्थेच्या अनेक मुलींनी कुस्तीच्या भरवशावर पोलीस दलात व सरकारी नोकरीत प्रवेश मिळविला. शेतमजुरी करणा-या मुली शिकताहेत कुस्तीमोरेश्‍वर महिला कुस्ती संस्थेमध्ये कुस्ती खेळण्यास येणार्‍या प्रत्येक मुलींची वेगळी कहाणी आहे; परंतु एक साम्य सर्वांंमध्ये आहे, ते म्हणजे जवळपास सर्व मुली या शेतमजुरी करणार्‍या आहेत. दिवसभर शेतीत राबून शालेय शिक्षणाची आवड आणि कुस्तीचं वेड जोपासत आहेत. संस्थेमध्ये ४५ मुली नियमित सराव करतात. या मुलींकडून एक छदामही मोरेश्‍वर महिला कुस्ती संस्थेच्या अध्यक्ष सुनीता कडोळे घेत नाहीत. सुनीताताईंचे पती मोरेश्‍वर कडोळे उत्तम कुस्तीगीर असून, सुनीताताईंना त्यांचे नेहमीच प्रोत्साहन लाभते.