शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

श्रमदान करून वडिलांना वाहिली आदरांजली

By admin | Updated: April 22, 2017 01:13 IST

बाळापूरचे उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या कुटुंबीयांनी वडिलांच्या स्मृतिदिनाला श्रमदानात परावर्तित केले.

अकोला : बाळापूरचे उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या कुटुंबीयांनी वडिलांच्या स्मृतिदिनाला श्रमदानात परावर्तित केले. शिर्ला गावासाठी तीन लाख लीटर पाणीसाठा निर्माण करीत समाजापुढे नवा आदर्श उभा केला. एसडीओ खडसे यांचे वडील महादेव खडसे यांचे गेल्या वर्षी निधन झाले. त्यांचा आज पहिला स्मृतिदिन शिर्ला येथे त्यांच्या परिवारातील ४९ सदस्यांनी तब्बल दोन तास श्रमदान केले.श्रमदानातून ३0 समतल चर खोदले. त्यातून तीन लाख लीटर वाहून जाणारे पाणी थांबण्याची क्षमता या क्षेत्रात निर्माण झाली. एरव्ही आपण स्मृतिदिन समाजात शेकडो रुपये खचरून करतो; मात्र एसडीओ खडसे यांनी परंपरेला फाटा दिला. शिर्ला गावाच्या दुष्काळमुक्तीसाठी योगदान देत नवा आदर्श निर्माण केला. त्यांनी श्रमदानासोबतच दहा तास जलसंधारणासाठी जेसीबी यंत्र स्वखर्चाने उपलब्ध करून दिले. यावेळी सुमित्राबाई अंधारे महाविद्यालयाचे अध्यक्ष कृष्णाभाऊ अंधारे यांनी ३१ हजार रुपयांची नगदी, तर विजय कोकाटे यांनी २१ हजारांची देणगी सरपंच रिना शिरसाट, सचिन कोकाटे यांना सुपूर्द केली. श्रमदान केल्यानंतर कालकथित महादेवराव खडसे यांना माळरानावरच श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी कमलाबाई महादेवराव खडसे, प्रा. संजय खडसे, नीता संजय खडसे, डॉ. सतीश खडसे, डॉ. सुनीता खडसे, गौतम खडसे, सुदाम मनवर, लता मनवर, बेबी मनवर, काशीराम निमकंडे आदी उपस्थित होते. संचालन संतोषकुमार गवई यांनी, तर आभार सचिन कोकाटे यांनी मानले. श्रमदान मोहिमेत जलसैनिक तथा शिर्ला गावकरी सहभागी झाले होते.