शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

World No Tobaco Day : तंबाखू दरवर्षी घेतो १० लाखांवर जीव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 10:35 IST

देशात दरवर्षी रस्ता किंवा इतर अपघातात ५० हजार लोक मृत्युमुखी पडतात; मात्र तंबाखूमुळे साधारणत: १० लाख लोकांचा मृत्यू होतो.

ठळक मुद्देदर ५ व्यक्तींमधील एका व्यक्तीच्या मरणाचे कारण तंबाखू आहे. अनेक प्रकारचे रोग जडतात आणि त्याचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम दिसून येतो.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : देशात कोरडी पाने, सिगारेट, बिडी, चिलम, गुटखा आदी अशा विविध रूपात तंबाखू सेवन केले जाते. देशात दरवर्षी रस्ता किंवा इतर अपघातात ५० हजार लोक मृत्युमुखी पडतात; मात्र तंबाखूमुळे साधारणत: १० लाख लोकांचा मृत्यू होतो. दर ५ व्यक्तींमधील एका व्यक्तीच्या मरणाचे कारण तंबाखू आहे. अशी माहिती लोकसेवा संघाचे अध्यक्ष डॉ. योगेय साहू यांनी दिली.तंबाखू सेवनामुळे अनेक प्रकारचे रोग जडतात आणि त्याचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम दिसून येतो. यामध्ये अधरोस्कोलोरोसिस, हार्ट अटॅक, पेरिफेरल वॅस्कुलर डिसिज, ब्रेन स्ट्रोक, अ‍ॅम्पायसिमा लंग, कॅन्सर, फिटल डॅमेज, लॉरेंजियल कॅन्सर, डेंटल प्रॉब्लेम, ल्युकोप्लाकिया, ओरल सबम्युकोसल फायब्रोसिस, ओरल कॅन्सर तसेच प्रती दिवशी २० सिगारेट ओढणारा व्यक्ती आपले आयुष्य १० वर्षांनी कमी करून घेतो. गुटखा खाणाऱ्या व्यक्तीमध्ये वारंवार तोंड येणे, तोंडात लाल व पांढरे चट्टे दिसणे, जेवण करताना तिखट लागणे, तोंड कमी उघडणे, तोंडातील एखादी जखम एक महिन्यापेक्षा जास्त न बसणे, तोंडात एखादी अनावश्यक गाठ आढळणे, जिभेला असणारी एखादी गाठ होणे, आवाजात झालेला बदल, लाळग्रंथीच्या जागेवर सूज येणे आदी लक्षणे हळूहळू दिसून येतात, असेही त्यांचे म्हणने आहे.

तंबाखूतील विषारी द्रव व त्याचे शरीरावर होणारे परिणामनिकोटिन : कॅन्सर, रक्तचाप,कार्बन मोनोक्साईड : हृदयरोग, अंधत्व, दमा.मार्श गॅस : शक्तिहीनता, नपुंसकताअमोनिया : मंद पाचनशक्ती, पित्ताशय, विकृतीकोलोडॉन : स्नायूमध्ये विकृती, डोके दुखणेपापरीडीन: अजीर्ण, डोळ्यांची जळजळकार्बालिक अ‍ॅसिड : अनिद्रा, विस्मरणपरफेरॉल: अशक्तपणाअँजेलिन सायनोझोन: रक्तविकारफॉस्फोरल प्रोटिक अ‍ॅसिड : उदासीनता, टीबीयोग करायोग करून आपल्या मनाचा कठोर निश्चय करा व संकल्प शक्ती वाढवून या नशेचा परित्याग करा. उपचार म्हणून शस्त्रक्रिया, किमोथेरपी, रेडिओथेरपी करता येते. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन केल्यास कर्करोग होतो; पण वेळेवर उपचार केल्यास बरा होऊ शकतो.तंबाखूपासून दूर राहावे‘तंबाखूमुक्त भारत’ ही संकल्पना डॉ. साहू तंबाखू प्रतिबंधात्मक केंद्राच्या माध्यमातून गेल्या २० वर्षांपासून राबवित असून, भारतातील हे पहिले केंद्र असल्याचे त्यांनी सांगितले. तंबाखू दिनानिमित्त तंबाखू त्यागाचा संकल्प करावा, असे आवाहन करत तरुणांनी तंबाखूपासून दूर राहावे.

 

टॅग्स :AkolaअकोलाTobacco Banतंबाखू बंदी