शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

माणसाला माणूस बनविण्याचे काम ग्रंथ करतात - विठ्ठल वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2016 01:40 IST

अकोला जिल्हा ग्रंथोत्सवाला थाटात प्रारंभ.

अकोला : आजच्या गढूळ वातावरण मन गढूळ बनविण्याचे काम अनेक गोष्टी करीत आहेत. अशा परिस्थितीत माणसाला त्याच्या मनातील वाईट विचार धुवून काढायचे असतील तर त्याने ग्रंथाकडे वळले पाहिजे. माणसाला माणूस बनविण्याचे काम ग्रंथ करतात असे मत लोककवी डॉ. विठ्ठल वाघ यांनी सोमवारी येथे व्यक्त केले. जिल्हा प्रशासन व जिल्हा ग्रंथालयाच्यावतीने आयोजित ग्रंथोत्सवाचे उद्घाटन प्रमिलाताई ओक हॉल येथे डॉ. विठ्ठल वाघ यांच्या हस्ते झाले यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महापौर उज्वला देशमुख होत्या. यावेळी मंचावर आमदार गोवर्धन शर्मा, ज्येष्ठ पत्रकार प्रा. मधू जाधव, प्रभात किडस्चे संचालक डॉ .गजानन नारे, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सोपान सातभाई, रंगकर्मी अशोक ढेरे, पत्रकार डॉ. किरण वाघमारे, प्राचार्य डॉ. एस.आर. बाहेती, प्रमिलाताई ओक वाचनालयाचे सचिव मनमोहन तापडिया, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष श्यामराव वाहुरवाघ आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलतांना डॉ.विठ्ठल वाघ यांनी जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोण ग्रंथ देत असल्याचे सांगितले. आपल्या डोळ्यात अंजन घालण्याची कुवत साहित्यात आहे असे सांगतांना विठ्ठल वाघ यांनी कवितेने डोळे दिले कवितेने दृष्टी दिली, कवितेने नवी नवी सृष्टी दिली ही कविता म्हणून दाखविली. लेखक हा कलाकृतीत आपला जीव ओतत असतो. आपण आपल्या कोषातून बाहेर पडून साहित्यकृतीशी एकजीव झालो तर आपल्याला त्याचा आनंद घेता येईल. आज चित्रपट, विविध वाहिण्यांमधून कळत-नकळत घाणेरडे संस्कार आपल्या पाल्यावंर पडत आहेत. अशा परिस्थितीत ग्रंथाची संगत केली तर निश्‍चितच आपल्या मनातील वाईट विकार धुवून निघाल्या शिवाय राहणार असे आशावाद वाघ यांनी व्यक्त केला. शेवटी त्यांनी आपली शेतकर्‍यांच्या जीवनाचे चित्रण करणारी ह्यपेचह्ण ही कविता सादर केली. महापौर उज्वला देशमुख यांनी घरातूनच संस्काराचे बीजारोपण होणे आवश्यक असल्याचे सांगितले. ग्रंथ हे मनाला सुसंस्कारीत करण्याचे काम करीत असतात त्यामुळे प्रत्येकाने ग्रंथांची कास धरावी असे आवाहन उज्वला देशमुख यांनी केले. प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी सोपान सातभाई यांनी केले. आभार श्यामराव वाहुरवाघ यांनी मानले. ग्रंथदिंडीने आणली रंगतग्रंथोत्सवाचा आरंभ ग्रंथदिंडीने झाला. खुले नाट्यगृह, गांधी चौक, सिटी कोतवाली, तिलक मार्ग, जुना कापड बाजार, सराफा बाजार, दाना बाजार, जैन मंदीर, गांधी चौक, महापालिका मार्गे प्रमिलाताई ओक हॉल येथे दिंडी पोहोचली. दिंडीत भजनी मंडळ व कलापथकाने सहभाग घेतला व ग्रंथांचे महत्त्व विदित केले.