शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
3
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
4
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
5
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
6
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
7
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
8
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
9
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
10
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
11
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
12
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
13
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
14
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
15
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
16
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
17
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
18
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
19
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
20
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान

आयुष्याच्या संध्याकाळी संघर्ष करणार्‍या महिला कामगारांचा सन्मान * कस्तुरी चॅरिटेबल सोसायटीचा उपक्रम

By admin | Updated: May 3, 2014 19:08 IST

कोणावरही अवलंबून न राहता कष्ट करून स्वाभिमानाने संसाराचा गाडा ओढणार्‍या १५ कामगार महिलांचा कस्तुरी चॅरिटेबल सोसायटीतर्फे कामगार दिनाच्या निमित्ताने सत्कार करण्यात आला.

अकोला : कोणावरही अवलंबून न राहता कष्ट करून स्वाभिमानाने संसाराचा गाडा ओढणार्‍या १५ कामगार महिलांचा कस्तुरी चॅरिटेबल सोसायटीतर्फे कामगार दिनाच्या निमित्ताने सत्कार करण्यात आला. राज्यात कामगार दिन उत्साहात साजरा होतो. १ मे रोजी कस्तुरी चॅरिटेबल सोसायटीतर्फे अकोल्यात वयोवृद्ध निराधार कामगार महिलांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. आयुष्याच्या संध्याकाळी धुणीभांडी, इतरांच्या घरी स्वयंपाक, मजुरी करणार्‍या महिलांचा नऊवारी पातळ, चोळी व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये रुखमाबाई चंदनगोळे, कुसुमबाई सकळे, शशिकला ढोके, मैनाबाई पाटील, कलावती वाच, शांताबाई खंडारे, अनुसया देशमुख, शकुंतला बेडेकर, सरला यादव, दुर्गाबाई राईकर, सुमित्रा राठोड, कामिनीबाई मोरखडे, कुसुम सोनोने, उज्ज्वला इंगळे या महिलांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला सोसायटीचे अध्यक्ष प्रा. किशोर बुटोले, सचिव के.एस. घोरपडे, डॉ. शांताराम बुटे, शांताबाई आळशी, प्रभाताई पांडे, हभप सुजित महाराज देशमुख, डॉ. नानासाहेब चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. मेघा कनकेकर, प्रा. चेतना आनंदाणी, अपर्णा काळे, राजेश्वर पेठकर, संजय ठाकरे, अनिल उगवेकर, आशा उगवेकर, जयंत जोशी, दीपक वाघमारे, प्रशांत पाटील, संजय बुटोले, अतुल कुळकर्णी, दमोदर नुपे यांनी परिश्रम घेतले. बॉक्स...उतार वयात संसाराचा गाडा ओढणारी गयाबाईकिरकोळ भाजीपाला विक्रेता असलेल्या पतीचे निधन झाले... तरुण मुलालाही मृत्यूने कवटाळले.... अशा प्रतिकूल परिस्थितीतही गयाबाई हिरुळकर या महिलेने जीवनाशी संघर्ष सुरू ठेवला. आयुष्याच्या संध्याकाळी ही महिला सून व नातवंडांचा सांभाळ करीत आहे. गयाबाई उतारवयात धुणीभांडीसारखी मिळेल ते काम करून संसाराचा गाडा ओढत आहे. कामगार दिनानिमित्त कस्तुरी चॅरिटेबल सोयसायटीतर्फे गयाबाईचाही सत्कार करण्यात आला. फोटो: सत्कार सोहळ्याप्रसंगी उपस्थित मान्यवर व कष्टकरी महिला.