शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

७२ कोटींसाठी अडली १३ हजार घरकुले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 10:27 IST

७२ कोटींपेक्षाही अधिक निधीची गरज असून, तो मिळत नसल्याने आता ऐन पावसाळ्याच्या तोंडावर घरकुलाची कामे अपूर्ण असल्याने लाभार्थी हवालदिल झाले आहेत.

- सदानंद सिरसाट लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यातील सर्वच योजनांतून मंजूर घरकुल लाभार्थींना जानेवारीपासून हप्त्यांच्या देयकांची रक्कम न मिळाल्याने जिल्ह्यातील १३,८२३ घरकुले अद्यापही अपूर्ण आहेत. या घरकुलांसाठी केंद्र व राज्य शासनाकडून ७२ कोटींपेक्षाही अधिक निधीची गरज असून, तो मिळत नसल्याने आता ऐन पावसाळ्याच्या तोंडावर घरकुलाची कामे अपूर्ण असल्याने लाभार्थी हवालदिल झाले आहेत.‘सर्वांना घरे’ या संकल्पनेतून २०२२ पर्यंत ग्रामीण व शहरी भागातील बेघरांना घरकुले देण्याची घोषणा केंद्र शासनाने २०१६ पासूनच केली आहे. त्यानंतर ग्रामीण व शहरी भागातील सर्वसाधारण लाभार्थींसाठी केंद्र शासनाची प्रधानमंत्री आवास योजना, तर राज्य शासनाने अनुसूचित जाती लाभार्थीसाठी रमाई आवास योजना, आदिवासींसाठी शबरी व पारधी घरकुल योजना या दोन्ही विभागाच्या स्वतंत्र निधीच्या तरतुदीतून सुरू केल्या. ग्रामीण भागातील प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थींनी घरकुलाचे दुसऱ्या, तिसºया हप्त्यांची देयके दाखल केली. त्यांना जानेवारीपासून निधी नसल्याच्या कारणावरून देयकच अदा होत नसल्याचा प्रकार घडत आहे. विशेष म्हणजे, हा निधी केंद्रीय पद्धतीने वाटप केला जातो.

देयक अपलोड केल्यानंतर लाभार्थींच्या खात्यात रक्कम जमा केली जाते; मात्र आता देयकेच मिळत नसल्याने घरकुलांचे काम कधी पूर्ण करावे, ही समस्या जिल्ह्यातील ९,८४३ लाभार्थींना आहे. त्यातच आता काही दिवसांतच पावसाळा सुरू होत आहे. आधीच्या निवासाची व्यवस्था मोडून घरकुल बांधकाम सुरू केले. ते पूर्ण न झाल्याने पावसाळ्यात कुणाकडे आश्रय घ्यावा, या विवंचनेत लाभार्थी आता धास्तावले आहेत. त्यासोबतच रमाई आवास योजनेचे ३,६४०, शबरी घरकुल-२१३, पारधी-१२७ लाभार्थींची घरकुले अपूर्ण आहेत. या सर्व घरकुल लाभार्थींनी काम पूर्ण झाल्याची देयकेही दाखल केली आहेत; मात्र गत जानेवारीपासून त्यासाठीची रक्कम खात्यात जमा होत नसल्याने घरकुलांची कामे अपूर्ण आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाGovernmentसरकार