शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘जलयुक्त शिवार’ कामांचे आराखडे रखडले!

By admin | Updated: March 8, 2016 02:21 IST

अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यांतील ५१९ गावांमध्ये कामे केव्हा सुरू होणार?

संतोष येलकर/अकोला जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्ह्यांमध्ये यावर्षी ५१९ गावांची निवड करण्यात आली; मात्र निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये करावयाच्या कामांचे जिल्हास्तरीय आराखडे मंजूर करण्याची प्रक्रिया अद्याप रखडली आहे. त्यामुळे निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये ह्यजलयुक्त शिवारह्णची कामे केव्हा सुरू होणार, असा प्रश्न निर्माण होत आहे.राज्यात वारंवार उद्भवणार्‍या टंचाईच्या स्थितीवर मात करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून राज्य शासनामार्फत गतवर्षीपासून जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत गतवर्षी प्रत्येक जिल्ह्यात निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये जलयुक्त शिवारची कामे करण्यात आली. त्यापैकी काही गावांमधील कामे पूर्ण होणे अद्याप बाकी आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत दुसर्‍या टप्प्यात यावर्षी गावांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये अमरावती विभागातील अकोला, बुलडाणा आणि वाशिम या तीन जिल्ह्यांतील ५१९ गावे आहेत. निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये शिवारफेरी काढून आणि ग्रामसभांची मंजुरी घेऊन जलयुक्त शिवारची कामे करावयाची आहेत. त्यानुषंगाने निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये शिवारफेर्‍या काढण्यात आल्या; परंतु निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये करावयाच्या जलयुक्त शिवारच्या कामांचे जिल्हा कृती आराखडे अद्याप पूर्ण करण्यात आले नाहीत. आराखडे तयार नसल्याने कामांच्या जिल्हा आराखड्यांना जिल्हास्तरीय समितीकडून मान्यता देण्याची प्रक्रिया रखडली आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी जलयुक्त शिवारची कामे करावयाची आहेत; मात्र कामांच्या जिल्हा आराखड्यांना मंजुरी मिळणे अद्याप बाकी असल्याच्या स्थितीत निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये ह्यजलयुक्त शिवारह्णची कामे केव्हा सुरू होणार, असा प्रश्न निर्माण होत आहे.

'शिवारफेरी' काढण्याचे काम पूर्ण!जलयुक्त शिवार अभियानांतर्गत यावर्षी निवड करण्यात आलेल्या अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्ह्यांतील ५१९ गावांमध्ये ग्रामस्थ-शेतकर्‍यांची शिवारफेरी काढण्याचे काम पूर्ण करण्यात आले. शिवारफेरीमध्ये गावातील पाण्याची गरज आणि त्यासाठी करावयाची ह्यजलयुक्त शिवारह्णची कामे; यासंदर्भात नियोजन करण्यात आले. प्रत्यक्षात कामे सुरू होणे अद्याप बाकी आहे.

'जलयुक्त शिवार' कामांसाठी निवडलेली जिल्हानिहाय गावेजिल्हा      गावेअकोला    १२५बुलडाणा   २४0वाशिम     १५४...................एकूण       ५१९