शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची कामे अपूर्ण; कारवाईला फाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 12:10 IST

मुदतीत कामे न करणाऱ्या कंत्राटदारांवर कोणती कारवाई केली, याची माहिती मुख्यमंत्री ग्रामसडक योजना कार्यालयात दडवून ठेवण्याचा प्रकार घडत आहे.

- सदानंद सिरसाट लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जिल्हा परिषदांच्या अखत्यारित असलेले ग्रामीण भागातील रस्ते निर्मितीची कामे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करण्याचा सपाटा राज्य शासनाने लावला; मात्र त्या रस्त्यांची कामे वेळेत पूर्ण करणे, दर्जाबाबत कमालीची गोपनीयता पाळली जात असल्याचा प्रकार अकोला जिल्ह्यात घडत आहे. आॅक्टोबर २०१८ मध्ये प्रशासकीय मंजुरी मिळालेल्या १७ पैकी किती रस्त्यांची कामे पूर्ण झाली, मुदतीत कामे न करणाऱ्या कंत्राटदारांवर कोणती कारवाई केली, याची माहिती मुख्यमंत्री ग्रामसडक योजना कार्यालयात दडवून ठेवण्याचा प्रकार घडत आहे.राज्यातील ग्रामीण रस्त्यांची एकूण लांबी २ लाख ३६ हजार ८९० किमी आहे. त्यापैकी २ लाख ३ हजार ९९४ किमीचे रस्ते प्रत्यक्ष उपयोगात आहेत. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील ३० हजार किमी रस्त्यांचा त्यामध्ये समावेश आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यांत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजुरी दिली जात आहे. अकोला जिल्ह्यातील १७ रस्त्यांच्या १११.९० किमीच्या कामाला ९ आॅक्टोबर २०१८ रोजी ग्रामविकास विभागाने प्रशासकीय मंजुरी दिली. तसेच पाच वर्षे देखभाल व दुरुस्तीही केली जाणार आहे. ती कामे नोव्हेंबर २०१९ पर्यंत पूर्ण करणे आवश्यक होते; मात्र त्यापैकी अनेक कामे मुदतीनंतरही अपूर्ण आहेत. येत्या जूनअखेरपर्यंतही पूर्ण होणार की नाही, याची खात्रीही नाही.मुदतीत कामे न करणाºया कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेच्या कार्यकारी अभियंत्याची आहे. याबाबतची माहिती या दोन्ही कार्यालयातील संबंधितांकडून दडवून ठेवली जात आहे. माहिती घेण्यासाठी लोकप्रतिनिधी किंवा कुणीही गेल्यास तेथे जबाबदार अधिकारी उपस्थितच नसतात.नोव्हेंबर २०१९ पर्यंतच्या मुदतीची कामेमुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून २०१८ मध्ये प्रशासकीय मंजुरी मिळालेल्या रस्त्यांमध्ये अकोला तालुक्यातील सिसा बोंदरखेड ते सांगळूद, भौरद ते मोरगाव (भाकरे), काजळेश्वर ते तामशी, पिंजर ते भेंडी काजी, राज्य महामार्ग ते कवठा, हातरूण ते मालवाडा, राज्य महामार्ग ते बहादुरा, कुरूम ते कवठा सोपीनाथ, राष्ट्रीय महामार्ग ते राजनापूर खिनखिनी जिल्हा सीमेपर्यंत, राष्ट्रीय महामार्ग ते जाम ते सावरखेड, चौफुली ते सावरखेड, बोर्डी- शिवपूर-राहणापूर, वणी-वारुळा-खापरवाडी, बाभूळगाव-वरूड वडनेर, वाकोडी फाटा ते वाकोडी रस्ता, वाडी अदमपूर ते जाफ्रापूर-दहीगाव रस्ता, मुंडगाव-हिलालाबाद रस्ता ही कामे आहेत.

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद