खामगाव : कर्जाचे आमिष दाखवून ५६ जणींना प्रत्येकी ७ हजार असे एकूण ३ लाख ९९ हजार रु पये घेवून फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी काल रात्री दोघांविरुध्द गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली. तर आज न्यायालयासमोर हजर केले असता दोघांनाही ६ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. याबाबत अनिता गिरधारी शर्मा (वय ३0) रा.धोबी खदान पंढरीबाबा नगर यांनी दिलेल्या फिर्यादी त म्हटले आहे की, बुलडाणा येथील एस.एस.ससाने व संदीप मोरे या दोघांनी सम्राट बहुउद्देशीय सेवाभावी संस्था ही भारत सरकार मान्य हस्त व्यवसाय योजना राबविणारी नोडल एजन्सी असल्याचे सांगितले. तसेच या एजन्सीमार्फत महिलांना प्रत्येकी २ लाखाचे कर्ज देण्यात येते. त्यामुळे तुम्हाला प्र त्येकी २ लाखाचे कर्ज मिळवून देवू असे म्हणून एस.एस.ससाने व संदीप मोरे या दोघांनी प्रत्येकी १५0 रुपये घेतले. त्यानंतर एक महिन्याने कागद देवून शेअर्सच्या नावाखाली प्रत्येकी ६१0 रुपये घेण्यात आले. १५ दिवसांनी संदीप मोरे यांनी खामगाव येथे येवून प्रेरणा बँक उभारणीसाठी परत प्र त्येकीकडून ६१0 रुपये घेतले. त्यानंतर ३0 सप्टेंबर २0१४ या तारखेचा विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचा ५७ महिलांचा १४ लाख २५ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. मात्र हा धनादेश बँकेत वटविण्यासाठी नेला असता त्या खात्यात धनादेश वटविण्याएवढी रक्कम नसल्याने अनादरित झाला. त्यामुळे एस.एस.ससाने व संदीप मोरे या दोघांनी संगनमत करुन अनिता शर्मा व ५६ महिलांची ३ फेब्रुवारी २0१३ ते २९ सप्टेंबर २0१४ दरम्यान प्रत्येकी ७ हजार रुपये असे ३ लाख ९९ हजार रुपये घेवून २ लाख रुपये कर्ज देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केली असल्याचे लक्षात आले. अनिता शर्मा यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून खामगाव पोलिसांनी एस.एस.ससाने व संदीप मोरे अशा दोघांविरुध्द गुन्हा दाखल करुन अटक केली. दरम्यान आज या दोन्ही आरोपींना स्थानिक न्यायालयासमोर हजर केले असता दोघांनाही ६ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
महिलांची फसवणूक
By admin | Updated: October 5, 2014 01:03 IST