शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

दारू दुकानाविरुद्ध महिलांचा एल्गार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2017 20:38 IST

पातूर तालुक्यातील खानापूर ग्रामपंचायतच्या हद्दीत उभारण्यात आलेल्या दारूच्या दुकानास ग्रामस्थांनी विरोध दर्शविला आहे.

परवानगी रद्द करण्याची मागणीअकोला: पातूर तालुक्यातील खानापूर ग्रामपंचायतच्या हद्दीत उभारण्यात आलेल्या दारूच्या दुकानास ग्रामस्थांनी विरोध दर्शविला आहे. दारूच्या दुकानाची परवानगी रद्द करावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन निवेदन सादर केले.राज्य व राष्ट्रीय महामार्गांवर ५०० मीटरच्या आतील सर्व प्रकारची दारूची दुकाने बंद करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या पृष्ठभूमीवर पातूर शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील एका दारू दुकानाच्या मालकाने त्यांचे दुकान खानापूर ग्रामपंचायतच्या हद्दीत बांधण्याच्या हालचाली जानेवारी महिन्यापासून सुरू केल्या. या परिसरात दारूचे दुकान होऊ नये, यासाठी परिसरातील नागरिकांनी फेब्रुवारी महिन्यात रीतसर तक्रार केली होती; परंतु या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे १ एप्रिलपासून या परिसरात देशी दारूचे दुकान सुरू झाले. कार्यालयावर मोर्चा आणला. दारू दुकानाचे काम सुरू असलेल्या परिसरात गुरुकुल कॉन्व्हेंट, हनुमान मंदिर, नियोजित एज्यूविला पब्लिक स्कूल आहे. या परिसरात दुकान सुरू झाल्यास त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.खानापूर ग्रामपंचायतच्या हद्दीतील दारू दुकानाची परवानगी रद्द करावी, अन्यथा आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. याप्रसंगी प्रवीण प्रल्हाद इंगळे यांच्यासह ढोणे नगर, सम्यक कॉलनी, समता नगर या परिसरातील महिला व पुरुष उपस्थित होते.