शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सिझेरियन झालेल्या ओल्या बाळंतिणीला बेड अभावी ठेवलं जमिनीवर

By atul.jaiswal | Updated: August 27, 2021 12:07 IST

सर्वोपचार रुग्णालयातील प्रकार; वार्ड क्र. २ मध्ये गर्भवतींना बेड मिळेना

- अतुल जयस्वाल

अकोला : जिल्ह्यासह लगतच्या जिल्ह्यातील रुग्णांसाठी आधार असलेल्या येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र विभागाच्या वार्ड क्र. २ मध्ये बेडअभावी सिझेरियन झालेल्या ओल्या बाळंतिणीला चक्क दोन वेळा जमिनीवर ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर गुरुवारी आला आहे. कळस म्हणजे गादी पुरवण्यासही रुग्णालय प्रशासनाने नकार दिल्यामुळे या महिलेस सोबत आणलेल्या चादरीवर झोपावे लागले. नातेवाईकांनी तक्रार केल्यानंतर या महिलेस बेड मिळाला. तथापी, या वार्डात अजुनही अनेक महिलांना जमिनीवरच उपचार घ्यावे लागत असल्याचे वास्तव आहे.अकोला जिल्ह्यातील माहेर असलेल्या खामगावच्या एका गर्भवती महिलेस तिच्या माहेरच्या कुटुंबियांनी शनिवारी सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. शनिवारीच सिझेरियनद्वारे प्रसुती झाल्यानंतर या महिलेस वार्ड क्र. २ मध्ये बेड देण्यात आला. एक दिवस उलटल्यानंतर सोमवारी नवीन रुग्ण आल्यामुळे या महिलेस बेड रिकामा करण्यास सांगण्यात आले. नाइलाज असल्याने महिला व तिच्या आईने बेड रिकामा करताना किमान गादी तरी द्यावी, अशी मागणी केली. परंतु, कक्षात कार्यरत कर्मचार्यांनी गादीही देऊ शकत नसल्याचे सांगितल्याने शेवट सोबत आणलेल्या चादरीवरच ओल्या बाळंतीनीला झोपावे लागले. काही तासानंतर या महिलेस बेड देण्यात आला. बुधवारी सकाळी पुन्हा बेड रिकामा करण्यास सांगण्यात आला. बुधवारचा दिवस व पूर्ण रात्र या महिलेने जमीनीवरच काढली. गुरुवारी सकाळी या महिलेस बेड देण्यात आला.अनेक महिला जमिनीवरचमहिलेच्या भावाने याबाबत रुग्णसेवक संघटनेला कळविल्यानंतर जिल्हाध्यक्ष आशीष सावळे यांनी रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधला व बेड देण्याची विनंती केली. त्यानंतर गुरुवारी सकाळी या महिलेला बेड मिळाला. आशिष सावळे यांनी गुरुवारी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे ऑनलाइन तक्रारही केली आहे. अजुनही अनेक महिला जमीनीवरच ठेवण्यात आले आहे. या वार्डची क्षमता वाढविण्याची विनंती सावळे यांनी केली आहे.

क्षमता ३० गर्भवती महिला ६० पेक्षा अधिकगर्भवती महिलांसाठी असलेल्या वार्ड क्र. २ ची क्षमता केवळ ३० बेडची आहे. सद्या सर्वोपचार रुग्णालयात गर्भवती महिला दाखल होण्याचे प्रमाण वाढले असून, या वार्डात ६० पेक्षाही अधिक गर्भवती महिला दाखल आहेत. त्यामुळे अनेक महिलांना जमीनीवर ठेवण्यात आले आहे. दुसरा वार्ड नसल्याने नाईलाजाने हा पर्याय स्वीकारण्यात येत असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

कोरोनाची लाट ओसरल्यानंतर गत काही दिवसांपासून गर्भवती महिलांच्या शस्त्रक्रियांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वार्डात गर्दी वाढली आहे. उपाययोजना करण्यात येत आहेत.

- मिनाक्षी गजभिये, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला