शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

दगड कोसळल्याने महिला मजूर ठार

By admin | Updated: March 4, 2017 02:36 IST

बोरगाव मंजू येथील गिट्टी खदानमधील घटना.

बोरगाव मंजू (जि. अकोला), दि. ३- स्थानिक गिट्टी खदानवर काम करणार्‍या ५0 वर्षीय महिला मजुराचा डोक्यावर दगड कोसळल्याने मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी १२ वाजता घडली. बोरगाव मंजू पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. प्राप्त माहितीनुसार, रामजी नगरस्थित मनसुराबी सै.ताहेर अली या तापडिया यांच्या गिट्टी खदानवर मजूर म्हणून कामावर होत्या. दरम्यान, शुक्रवारी दुपारी १२ वाजता हॉपरमध्ये एका टिप्परमधील दगड टाकत असताना अंदाजे ५0 ते ६0 किलो वजनाचा दगड मनसुराबी यांच्या अंगावर कोसळला. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या व घटनास्थळावरच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. ठाणेदार काटकर यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी अशोक गवई यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बोरगाव मंजू पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. मृतक महिलेची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. एक मुलगा व पती असे त्यांचे कुटुंब असून, दररोज कामावर गेल्याशिवाय त्यांच्या पोटाची खळगी भरत नाही. त्यामुळे या महिलेला अशा धोक्याच्या ठिकाणी काम करावे लागत असे. शासनाने त्यांच्या कुटुंबाला मदत देण्याची मागणी होत आहे.