शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

कार, दुचाकी व ट्रॅक्ट्ररच्या अपघातात महिला ठार

By admin | Updated: July 11, 2017 01:35 IST

पीडीकेव्ही जवळची घटना : दुचाकीचा चुराडा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: पीकेव्हीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर सोमवारी सायंकाळी भरधाव ट्रॅक्टरने कार व दुचाकीला जबर धडक दिली. तीन वाहनांमध्ये घडलेल्या या विचित्र अपघातात गीताबाई आनंदराव सावळे ही महिला जागेवरच ठार झाली असून, त्यांचा पती व एक मुलगी गंभीर जखमी झाले आहे. एमआयडीसी पोलिसांनी तीनही वाहने ताब्यात घेतली आहेत.मोठी उमरीतील लक्ष्मी नगर येथील रहिवासी आनंदराव परशुराम सावळे (७२) हे त्यांची पत्नी गीताबाई आनंदराव सावळे (६५) यांना घेऊन एम एच ३० एयू ३९८ क्रमांकाच्या दुचाकीने शिवणी येथून पीकेव्हीच्या मुख्य प्रवेशद्वारामधून उमरीकडे जाण्याच्या तयारीत होते. यावेळी अकोल्यावरून मूर्तिजापूरकडे भरधाव जात असलेल्या एम एच ३० जे ८६४१ क्रमांकाच्या ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. त्यानंतर या ट्रॅक्टरने पीकेव्हीच्या प्रवेशद्वारासमोर उभ्या असलेल्या एका कारलाही जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील गीताबाई आनंदराव सावळे यांचा जागेवरच मृत्यू झाला, तर त्यांचे पती आनंदराव सावळे व या ठिकाणी उभी असलेली मूर्तिजापूर तालुक्यातील कंझरा येथील मुलगी रुबीना बी खा हे दोघे गंभीर जखमी झाले. या जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेमध्ये दुचाकीचा चुराडा झाला असून, कारचेही नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर शेळके यांनी कर्मचाऱ्यांसह धाव घेऊन जखमींना उपचारासाठी पाठविले तर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविला. या प्रकरणातील ट्रॅक्टर चालकास ताब्यात घेतल्याची माहिती आहे.