शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA: भारताला मोठा धक्का! शुबमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर, अनुभवी खेळाडूला कर्णधारपद
2
दिल्ली ब्लास्ट: जहाल भाषणे, बाँब बनवण्याचे धडे... अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या फोनमध्ये काय काय सापडले?
3
अनिल अंबानींच्या कंपन्यांच्या शेअर्सची बिकट स्थिती, ६०% पेक्षा अधिक आपटले; तुमच्याकडे आहेत का?
4
मुंबई महानगरपालिकेत भाजपा मुसंडी मारणार? १००हून अधिक जागा जिंकणार, अंतर्गत सर्व्हेतून दावा
5
IND vs SA 2nd Test : MS धोनीच्या एलिट क्लबमध्ये सामील होणार रिषभ पंत! जाणून घ्या त्याचा कॅप्टन्सीतील रेकॉर्ड!
6
पगार मिळताच अकाउंट होते खाली? '५०-३०-२०' नियमाचा वापर करून ६ महिन्यांत फरक पाहा
7
"मनसे महाविकास आघाडीचा भाग नाही, आमचा निर्णय..."; नेते संदीप देशपांडेंनी मांडली स्पष्ट भूमिका
8
नोटांचे बंडल, सोन्याचे दागिने...; बंगाल, झारखंडमध्ये कोळसा व्यापाऱ्यांच्या घरांवर ईडीचे छापे
9
"सुनील तटकरे लवकरच भाजपमध्ये जातील, हे त्रिवार सत्य आहे", एकनाथ शिंदेंच्या नेत्याचा खळबळजनक दावा
10
खेडमध्ये वैभव खेडेकरांच्या पदरी निराशा; पत्नीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आली वेळ, काय घडलं?
11
"देवाच्या कृपेने वाचलो...", बिग बॉस विजेत्या शिव ठाकरेच्या घरी लागलेल्या आगीत ट्रॉफीही जळाल्या
12
वाद चिघळणार! ठाण्यात शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण; भाजपाच्या माजी नगरसेवकावर आरोप
13
Spiritual: आयुष्याच्या अखेरीस प्रत्येकाची पडते शनी महाराजांशी गाठ; मार्गशीर्षात करा 'हे' बदल!
14
अल फलाह विद्यापीठाचे पुढे काय होणार? डॉक्टरकीचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला!
15
जपानवर मोठे आर्थिक संकट? ३० वर्षांचा 'येन कॅरी ट्रेड' मोडीत; जागतिक बाजारात मोठा उलटाफेर होण्याची भीती!
16
TATA ची 'ही' कंपनी ५० टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार, यापूर्वी TCS मधून १२ हजार कर्मचाऱ्यांना दिलेला नारळ
17
मतविभाजनाची भीती! ठाकरे गटाकडून काँग्रेसची मनधरणी, बड्या नेत्याची वर्षा गायकवाडांशी चर्चा 
18
पाकिस्तानमध्ये मध्यरात्री भूकंपाचे हादरे; ५.२ तीव्रतेचा धक्का, डोंगराळ भागात केंद्रबिंदू
19
गौतम गंभीरचे प्रयोग टीम इंडियाला झेपेना; दीड वर्षात नंबर ३ वर खेळवले तब्बल सात फलंदाज
20
"अरे ऐक ना जरा हसतोस का...", मराठी गाण्यावर विद्या बालनने बनवला रील, मिथिला पालकरला टॅग करत म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया बेतली महिलेच्या जीवावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 15:10 IST

अकोला: कुटुंब नियोजन योजनेंतर्गत मुंडगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पाथर्डी (ता. तेल्हारा) येथील महिलेची शस्त्रक्रिया करण्यात आली; पण ही शस्त्रक्रिया त्या महिलेच्या जीवावर चांगलीच बेतली असून, सध्या या महिलेवर मुंबई स्थित जे.जे. इस्पितळात उपचार सुरू आहेत.

अकोला: कुटुंब नियोजन योजनेंतर्गत मुंडगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पाथर्डी (ता. तेल्हारा) येथील महिलेची शस्त्रक्रिया करण्यात आली; पण ही शस्त्रक्रिया त्या महिलेच्या जीवावर चांगलीच बेतली असून, सध्या या महिलेवर मुंबई स्थित जे.जे. इस्पितळात उपचार सुरू आहेत. या प्रकाराला प्राथमिक आरोग्य केंद्रावरील डॉक्टरांचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप महिलेच्या पतीने केला.प्राप्त माहितीनुसार, मुंडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत पाथर्डी (ता. तेल्हारा) येथील रहिवासी मीना संतोष नावकार यांना कुटुंब नियोजन कार्यक्रमांतर्गत शस्त्रक्रियेसाठी तयार करण्यात आले. त्यानुसार, २४ जानेवारी रोजी त्यांच्यावर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शस्त्रक्रिया करण्यात आली. सहा दिवसांनी टाके काढण्यासाठी त्या पीएससीमध्ये गेल्या. त्यावेळी डॉक्टरांना त्यांच्या पोटावर सूज असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी ३० जानेवारी रोजी महिलेला तत्काळ सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान डॉक्टरांनी ड्रेसिंग काढताच पोटाची त्वचा निघाली. हे दृश्य पाहून डॉक्टरही थक्क झाले. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार महिलेला खासगी रुग्णालयात हलविले. उपचारादरम्यान महिलेची प्रकृती गंभीर झाल्याने २१ फेब्रुवारी रोजी त्यांना मुंबईतील जे.जे. इस्पितळात दाखल करण्यात आले; पण त्या ठिकाणी महिलेच्या पोटावरील ड्रेसिंग उघडताच परिस्थिती आणखी चिंताजनक झाल्याची माहिती महिलेच्या पतीने दिली.‘इन्फेक्शन’मुळे हा प्रकार झाल्याची माहितीयाप्रकरणी सर्वोपचारमधील तज्ज्ञ परिचारिकेसोबत संवाद साधला असता, हा प्रकार इन्फेक्शनमुळे होण्याची दाट शक्यता असल्याची माहिती त्यांनी दिली. चुकीच्या पद्धतीने शस्त्रक्रिया किंवा शस्त्रक्रियेनंतर रुग्णाचा निष्काळजीपणा यामुळे इन्फेक्शन झाल्याचा प्रकार झाल्याची माहिती त्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.माझ्या पत्नीला कुठलाच आजार नव्हता. तिला कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेसाठी नेण्यात आले. त्या ठिकाणी डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे माझ्या पत्नीला नरकयातना भोगाव्या लागत आहेत.- संतोष नावकार, रुग्ण महिलेचे पती.

शस्त्रक्रियेच्या तीन दिवसांनंतर महिलेच्या पोटात दुखते म्हणून ती प्राथमिक आरोग्य केंद्रात आली होती. तपासणीदरम्यान शस्त्रक्रियेची त्वचा लाल झाल्याचे दिसून आले. त्यामुळे वेळीच त्या रुग्णाला सर्वोपचारमध्ये दाखल केले. पुढील उपचार सर्वोपचार रुग्णालयात झाला. त्या महिलेसोबतच इतर १० महिलांवर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांची प्रकृती उत्तम आहे. - डॉ. एस. एस. भिरडे, प्राथमिक आरोग्य केंद्र, मुंडगाव.

टॅग्स :Akolaअकोला