अकोला, दि. ३0- गोरक्षण रोडवरील माधवनगरातून एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. या प्रकरणी खदान पोलिसांनी पसार झालेल्या दोन दुचाकीचालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गोरक्षण रोडवरील दत्त मेडीकलजवळील कमला रेसिडन्सी येथील रहिवासी किरण भंवरप्रसाद तिवारी (६२) या त्यांच्या जाऊसोबत समृद्धी अपार्टमेंट माधवनगरातून जात होत्या. त्यांच्या समोरून दोन दुचाकीस्वार आले. किरण यांच्या गळ्यातील पोथ त्यांनी हिसकण्याचा प्रयत्न केला; परंतु अर्धी पोथ त्यांच्या गळ्यात राहिली. तर अर्धी पोथ आणि पेंडॉल चोरट्यांच्या हातात आले. हे घेऊनच दोन्ही चोरटे पसार झाले. चोरीस गेलेला मुद्देमाल हा २७ हजार रुपयांचा असल्याची माहिती आहे. किरण तिवारी यांच्या फिर्यादीवरून खदान पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
महिलेच्या गळय़ातील सोनसाखळी लंपास
By admin | Updated: January 31, 2017 02:29 IST