शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेचे मंगळसूत्र लंपास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:14 IST

खदान पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या कपिलावस्तू नगरजवळील चैतन्य कॉलनीमधील रहिवासी विवेक काकड यांची पत्नी संगीता काकड (४५) गुुरुवारी दुपारी १२ ...

खदान पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या कपिलावस्तू नगरजवळील चैतन्य कॉलनीमधील रहिवासी विवेक काकड यांची पत्नी संगीता काकड (४५) गुुरुवारी दुपारी १२ वाजता त्यांच्या घरासमोरील दरवाजाजवळ उभ्या होत्या. त्यावेळी तेथे दुचाकी वाहनावरून दोन युवक आले. यातील एक जण महिलेजवळ चिठ्ठी घेऊन आला आणि पत्ता विचारला. यावेळी संगीता काकड या चिठ्ठीवरील पत्ता बघत असताना अचानक त्या युवकाने त्यांच्या गळ्यातील दीड तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र ओढले व दुचाकीवरून फरार झाला. खदान पोलिसांनी गुन्हा दाखल करून काळ्या रंगाच्या दुचाकीचा शोध सुरू केला आहे.

कुरिअरची वाट बघताना घडली घटना

सूत्रानुसार गुरुवारी काकड कुटुंबीयांचे कुरिअरच्या माध्यमातून काही सामान येणार होते. कुरिअर बॉयने संगीता काकड यांना फोनवरून संपर्क करून त्यांच्या घरासमोर उभे राहण्यासाठी सांगितले होते. जेणेकरून त्याला काकड यांच्यापर्यंत सहजतेने पोहचून सामान देता येईल. संगीता काकड या कुरिअरने येणाऱ्या सामानाच्या प्रतीक्षेत घरासमोर उभ्या होत्या. दरम्यान, पाळत ठेवून असलेल्या दुचाकीवरील युवकांनी हीच संधी साधली.

वृद्ध महिलेच्या सतर्कतेने वाचले मंगळसूत्र

गौरक्षण रोडवरील नित्यानंदनगर परिसरातील भोले किराणाजवळदेखील बुधवारी उशिरा रात्री असाच प्रयत्न झाला. ७२ वर्षीय विजया बाळासाहेब कुकडे या बुधवारी उशिरा रात्री भोले किराणाजवळून जात होत्या. त्यावेळी त्यांच्याजवळ दुचाकीवर दोन युवक आले. त्यामधील एकाने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढण्याचा प्रयत्न केला; मात्र यावेळी महिलेने मंगळसूत्राला घट्ट पकडून ठेवले, त्यामुळे युवक मंगळसूत्र तोडण्यास अयशस्वी ठरले आणि दोघे फरार झाले.

अज्ञात व्यक्तीपासून सावध रहा!

खदान ठाण्यांतर्गत येणाऱ्या दोन परिसरातील चेनस्नॅचिंगच्या घटना पाहता गस्त वाढविण्यात आली आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. एखादा अज्ञात व्यक्ती कोण्या कारणाने जवळ येत असेल अथवा बोलविण्याचा प्रयत्न करीत असेल तर महिलांनी त्याला दूर ठेवण्याचा प्रयत्न करावा. सकाळी व सायंकाळी फिरणाऱ्या महिलांनीही सावध राहावे.

- जी.श्रीधर, पोलीस अधीक्षक