शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यातील जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रसुतीनंतर महिलेचा मृत्यू; बाळही दगावले!

By atul.jaiswal | Updated: October 20, 2017 17:28 IST

अकोला : प्रसुतीसाठी येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात (लेडी हार्डिंग) दाखल झालेल्या बुलडाणा जिल्ह्यातील झाडेगाव येथील महिलेचा प्रसुतीनंतर मृत्यू झाल्याची घटना ऐन दिवाळीच्या दिवशी १९ आॅक्टोबर रोजी घडली.

ठळक मुद्देनातेवाईकांची पोलिसांत तक्रार लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच गेली ‘लक्ष्मी’

अकोला : प्रसुतीसाठी येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात (लेडी हार्डिंग) दाखल झालेल्या बुलडाणा जिल्ह्यातील झाडेगाव येथील महिलेचा प्रसुतीनंतर मृत्यू झाल्याची घटना ऐन दिवाळीच्या दिवशी १९ आॅक्टोबर रोजी घडली. महिलेच्या पोटी जन्माला आलेल्या नवजात मुलीचाही विशेष नवजात शिशू दक्षता कक्ष (एसएनसीयू)मध्ये शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला. यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी आकोट फैल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील झाडेगाव-माणेगाव येथील विवाहिता सोनू भीमराव आगरकर (२३) यांना लक्ष्मीपुजनाच्या दिवशी गुरुवार, १९ आॅक्टोबर रोजी प्रसुतीकळा सुरु झाल्यानंतर त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी सकाळी ११ वाजताच्या सुमारास प्रसुतीसाठी येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात आणले. येथे दाखल झाल्यानंतर रात्री ९.२० वाजताचे दरम्यान सोनू आगरकर यांनी एका मुलीला जन्म दिला. रुग्णालयातील एका परिसेविकेच्या निगराणीखाली सामान्य प्रसुती झाली.त्यानंतर मात्र सोनू आगरकर यांची प्रकृती बिघडली. रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी अत्यवस्थ झालेल्या सोनू वाघमारे यांना सर्वोपचार रुग्णालयाकडे ‘रेफर’ केले. परंतु, तेथे त्यांचा मृत्यू झाला. कमी दिवसाच्या असलेल्या बाळाला जिल्हा स्त्री रुग्णालयातील ‘एसएनसीयू’मध्ये ठेवण्यात आले. परंतु, शुक्रवारी सकाळी सोनू आगरकर यांच्या नवजात मुलीचाही मृत्यू झाला. दरम्यान, गुरुवारी दिवाळीची सुटी असल्यामुळे रात्रीच्या वेळी रुग्णालयात डॉक्टर व कर्मचारी नसल्यामुळे एकट्या परिसेविकेला सोनू यांची प्र्रसुती करावी लागली. यावेळी डॉक्टर हजर असते, तर हा प्रकार घडला नसता असा आरोप करीत सोनू आगरकर यांच्या नातेवाईकांनी आकोट फैल पोलिसांत तक्रार दाखल केली. दरम्यान, सोनू आगरकर यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीनंतर त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला.म्हणे, सोनू होती ‘अ‍ॅनिमिक’सोनू आगरकर यांना प्रसुतीसाठी येथे आणले तेव्हा त्यांच्यात रक्ताल्पता होती व त्यांच्या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण ६.१ एम.जी. एवढे होते. त्यामुळे त्यांना येथे दोन वेळा रक्त चढविण्यात आले. प्रसुती ‘नॉर्मल’ झाल्यानंतर अर्ध्या-पाऊन तासाने सोनू यांची प्रकृती गंभीर झाल्यामुळे आम्ही त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात ‘रेफर’ केले. परंतु, तेथे त्यांचा मृत्यू झाला. ‘एसएनसीयू’मध्ये दाखल असलेल्या त्यांच्या नवजात मुलीचाही ‘प्रिमॅच्यूअरीटी’ व ‘आरडीएस’ मुळे मृत्यू झाला. - डॉ. तरंगतुषार वारे, निवासी वैद्यकीय अधिकारी, जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल