शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

महिलेची ग्रामविकास अधिका-यास मारहाण

By admin | Updated: August 10, 2016 01:08 IST

अकोला जिल्हा परिषदेतील घटना.

अकोला , दि. 0९ : संस्थेसाठी खुली जागा मिळण्याबाबत नाहरकत प्रमाणपत्र (एनओसी) मिळाले नसल्याने संतापलेल्या एका महिलेने मंगळवारी जिल्हा परिषद पंचायत विभागाला कुलूप ठोकल्यानंतर ग्राम विकास अधिकार्‍यास मारहाण केली. या घटनेने जिल्हा परिषद वर्तुळात एकच खळबळ उडाली होती.भारती क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव भारती निम यांनी संस्थेसाठी खरप बु. भागातील ई-क्लास खुली जागा मिळण्याबाबत प्रस्तावाच्या मंजुरीकरिता जिल्हा परिषदेचे नाहरकत प्रमाणपत्र (एनओसी) मिळण्याबाबत अर्ज केला होता; परंतु जिल्हा परिषद पंचायत विभागामार्फत एनओसी मिळाली नसल्याने, संतापलेल्या भारती क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव भारती निम यांनी मंगळवारी दुपारी १२.३0 वाजताच्या जिल्हा परिषद पंचायत विभागाच्या कार्यालयाला कुलूप ठोकले.अध्र्या तासानंतर कुलूप उघडल्यानंतर भारती निम पंचायत विभागाच्या कार्यालयात आल्या. जागेच्या ह्यएनओसीह्णबाबत ग्राम विकास अधिकारी मनोज बोपटे यांना त्यांनी विचारणा केली केली. यासंदर्भात ग्रामविकास अधिकारी बोपटे यांनी त्यांना पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना भेटण्यास सांगितले असता, संतापलेल्या भारती निम यांनी ग्राम विकास अधिकारी मनोज बोपटे यांना शिवीगाळ करीत, मारहाण केली.कार्यालयात उपस्थित कर्मचारी तसेच सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी विलास खिल्लारे यांनी त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला. जिल्हा परिषद पंचायत विभागातील एका ग्राम विकास अधिकार्‍याने महिलेने मारहाण केल्याच्या घटनेने जिल्हा परिषद वतरुळात एकच खळबळ उडाली होती.