शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

पिंजर येथील महिलेचा सर्पदंशाने मृत्यू

By admin | Updated: April 3, 2017 02:54 IST

उपचारास विलंब झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप.

पिंजर (अकोला), दि. २- येथील सरस्वतीबाई लहाने नगरमधील रहिवासी असलेल्या चित्रा ऊर्फ आरती दीपक गावंडे यांचा राहत्या घरात सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री १२ वाजता घडली. येथून जवळच असलेल्या भेंडगाव येथील मूळ रहिवासी असलेले दीपक गावंडे हे टेलरिंग व्यवसाय करतात. त्यांच्या पत्नी व ते स्वाध्याय परिवाराशी जुळलेले असल्याने ते उमरदरी येथून स्वाध्याय परिवाराचे कार्य आटोपल्यावर रात्री पिंजर येथील घरी परतले. रात्री १२ वाजता निद्रावस्थेत असताना आरती गावंडे यांना सापाने दंश केला. ही बाब दीपक गावंडे यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने आरती यांना शेजार्‍यांच्या मदतीने प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले; परंतु उपस्थित वैद्यकीय अधिकारी यांनी तातडीने उपचार न केल्यानेच आरती यांचा मृत्यू झाल्याचा आरोप गावंडे परिवाराने केला आहे. आरती यांना दोन चिमुकल्या मुली आहेत. आरती यांच्या मृत्यूमुळे चिमुकल्या मुलींचे मातृत्व हरविल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, उपस्थित वैद्यकीय अधिकार्‍याने सर्पदंशाने इजेक्शन दिले नसल्याची माहिती आहे. प्राथमिक उपचार करण्यास विलंब केल्याने मृतक महिलेच्या सासर्‍यांनी अंतविधीला उपस्थित असलेल्या आमदार हरीश पिंपळे यांना सांगितले. यावेळी आमदार पिंपळे यांनी चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले.