शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

महिलेचा मृत्यू; नातेवाईक संतप्त

By admin | Updated: July 3, 2017 01:47 IST

पोलिसांची मध्यस्थी: शस्त्रक्रियेसाठी घेतलेले अडीच लाख परत मागण्यासाठी वादंग

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोट येथील इफ्तिखार नगरातील महिलेचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान रविवारी दुपारी मृत्यू झाला. महिलेच्या डोक्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी घेतलेले अडीच लाख रुपये डॉक्टरांनी परत करावे, यासाठी मृतक महिलेच्या कुटुंबीय व नातेवाइकांनी संताप व्यक्त करीत हैदोस घातला आणि रुग्णालयात शिवीगाळ करीत तेथील कर्मचाऱ्यांसोबत वाद घातला. यावेळी रामदासपेठ पोलिसांनी घटनास्थळावर पोहोचून मध्यस्थी केल्याने वाद निवळला. अकोट येथील शाहनाज खातून अली खान (३८) हिचे डोके दुखत असल्याने, तिला रविवारी भागवत प्लॉटमधील खासगी रुग्णालयात भरती केले. या ठिकाणी महिलेच्या चाचण्या करण्यात आल्या. चाचणीदरम्यान डॉक्टरांनी महिलेला ब्रेन ट्युमरचा आजार असल्याचे निदान केले आणि शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचे स्पष्ट करीत अडीच लाख रुपये खर्च असल्याचे कुटुंबीयांना सांगितले. दरम्यान, महिलेच्या कुटुंबीयांनी शहरातील आणखी एका खासगी डॉक्टरला तिचा आरोग्य अहवाल दाखविला. या खासगी डॉक्टरने तिला ब्रेन ट्युमर नसून, तिच्या डोक्यात कर्करोगाची गाठ झाल्याचे सांगत, तिच्यावर शस्त्रक्रिया करणे धोकादायक असल्याचे कुटुंबीयांना सांगितले; परंतु महिलेच्या कुटुंबीयांनी तिच्या शस्त्रक्रियेसाठी अडीच लाख रुग्णालय प्रशासनाकडे जमा केले. महिलेवर उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला, त्यामुळे कुटुंबीय व महिलेच्या नातेवाइकांनी शस्त्रक्रियेसाठी डॉक्टरांनी घेतलेले अडीच लाख परत द्यावे, यासाठी रुग्णालयात हैदोस घातला आणि तेथील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करीत वाद घातला. घटनेची माहिती रामदासपेठचे ठाणेदार शैलेश सपकाळ यांना मिळताच, ते पोलीस कर्मचाऱ्यासह रुग्णालयात पोहोचले. या ठिकाणी त्यांनी कुटुंबीय व नातेवाइकांची समजूत घातली. अखेर कुटुंबीयांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला.