शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गर्भपाताच्या गोळ्या विकणाऱ्या महिलेस पकडले!

By admin | Updated: April 6, 2017 01:35 IST

अकोला- रहिमोन्निसा बेगम मो. याकुब या महिलेकडून मिजोप्रॉस नामक गर्भपाताच्या गोळ्यासह इतर सामग्रीचा अवैध साठा जप्त केला. परवाना नसताना सदर महिला या गोळ्या विकत होती.

गोळ्या, इतर सामग्री जप्त: ‘पीसीपीएनडीटी’ पथक, अन्न व औषध विभागाची कारवाईअकोला : मुलींचा जन्मदर वाढावा, यासाठी अवैध गर्भपात केंद्र आणि बोगस डॉक्टरांविरुद्ध ‘पीसीपीएनडीटी’ कार्यक्रमांतर्गत धडक मोहिमा सुरू असून, यानुषंगाने जिल्ह्यात गठित विशेष पथकाने बुधवारी युसुफ अली खदान परिसरात रहिमोन्निसा बेगम मो. याकुब या महिलेकडून मिजोप्रॉस नामक गर्भपाताच्या गोळ्यासह इतर सामग्रीचा अवैध साठा जप्त केला. कोणताही परवाना नसताना सदर महिला या गोळ्या विकत होती.शहरातील खदान परिसरात कोणत्याही प्रकारचे वैद्यकीय शिक्षण न घेतलेली एक महिला अवैधरीत्या गर्भपात करण्यासाठी उपयोगात येणाऱ्या गोळ्या विकत असल्याची आॅनलाइन व लेखी अशा दोन्ही स्वरूपातील तक्रारी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयास प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत जिल्हाधिकारी जी. श्रीकांत आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पीसीपीएनडीटी पथकाने बुधवारी दुपारी खदान परिसरातील या महिलेच्या घरी छापा टाकला. यावेळी तेथे मिजोप्रॉसच्या चार गोळ्या आढळून आल्या, तसेच गर्भपात करण्यासाठी उपयोगात येणारी साधनसामग्रीही जप्त करण्यात आली. कारवाईसाठी विशेष पथकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. याबाबत खदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. अन्न व औषधी विभागाचे निरीक्षक डॉ. प्रशांत अस्वार, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातील विधी समुपदेशक अ‍ॅड. शुभांगी खांडे, उमेश ताठे यांनी ही कारवाई केली. शहरातील दुसरी कारवाईपीसीपीएनडीटीने कारवाई करून गर्भपाताच्या गोळ्या पकडण्याची ही दुसरी कारवाई आहे. यापूर्वी पथकाने सापळा रचून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात कार्यरत सुनील निचळ नामक आरोग्य सहायकास गर्भपाताच्या गोळ्या अवैधरीत्या विकताना रंगेहात पकडले होते. याप्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी त्याचा साथीदार गजानन ढोके यालाही अटक केली. महिला करते आयाचे कामगर्भपाताच्या गोळ्यांचा अवैध साठा बाळगणारी महिला एका स्त्रीरोग तज्ज्ञाच्या रुग्णालयात कामावर आहे. तेथे ती गत अनेक दिवसांपासून कार्यरत आहे. ती केवळ नववी पास असून, तिच्याकडे कोणत्याही प्रकारचे वैद्यकीय ज्ञान नाही किंवा गोळ्या बाळगण्याचा परवाना नाही. तरीही महिला गर्भपाताच्या गोळ्या विकत असल्याचे आढळून आले.