शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
2
९ पानी चिठ्ठी, अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे...; IPS पूरन कुमार मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
3
थरार! जयपूर-अजमेर हायवेवर गॅस टँकरचा स्फोट; परिसरात हाहाकार, २० गाड्या आगीत भस्म
4
या देशाने आधीच भारतासोबत पंगा घेतला होता, आता पाकिस्तानचा उल्लेख करून ट्रम्प यांची स्तुती केली
5
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
6
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
7
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
8
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
9
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
10
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
11
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
12
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
13
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
14
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
15
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
16
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
17
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
18
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
19
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
20
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा

तरुणांच्या स्वप्नांना भरारी घेण्यासाठी हवे विस्तीर्ण आकाश!

By admin | Updated: January 16, 2017 01:20 IST

राज्यस्तरीय युवा मराठा साहित्य संमेलनाचे उद्घाटन; दुर्गेश सोनार यांचे प्रतिपादन.

अकोला, दि. १५- सध्याचा काळ हा वेगवेगळय़ा प्रकारच्या संघर्षाचा काळ आहे. तरुणांच्या आशा-आकांक्षांच्या दृष्टीने तर हा काळ आव्हानात्मक आहे. भली-बुरी अशी कितीतरी आडवळणे सध्याच्या तरुण पिढीसमोर उभी आहेत. या आडवळणातूनच तरुणांना स्वत:ची वाट निर्माण करायची आहे. आजचा तरुण या आडवळणातून वाट निर्माण करू पाहतोय. त्याच्या स्वप्नांना भरारी घेण्यासाठी विस्तीर्ण आकाश हवे ; परंतु असे वातावरण सध्याच्या काळात खरेच आहे का, याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आता आली आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक दुर्गेश सोनार यांनी रविवारी येथे केले.सृष्टी बहुउद्देशीय युवा संस्थेच्यावतीने येथील ज्युबिली इंग्लिश हायस्कूलच्या लोकमान्य टिळक सभागृहात पहिले राज्यस्तरीय युवा मराठा साहित्य संमेलनाचे उद्घाटन रविवारी सकाळी करण्यात आले. यावेळी अध्यक्षीय भाषणातून दुर्गेश सोनार बोलत होते. कार्यक्रमाला मंचावर संमेलनाध्यक्ष म्हणून दुर्गेश सोनार, उद्घाटक डॉ. संतोष हुसे, सचिन काटे, उमेश मसने, स्वागताध्यक्ष अँड. पप्पू मोरवाल, दिनेश भालतिलक उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना दुर्गेश सोनार म्हणाले, की युवकांचे पहिले राज्यस्तरीय संमेलन अकोल्यात होत आहे, ही साहित्य इतिहासातील महत्त्वाची घटना आहे. अकोल्याच्या भूमीतून अनेक साहित्यिक जन्मले आहेत. राज्यभरात विविध प्रकारची साहित्य संमेलने सातत्याने होत असतात. काही संमेलने ही विशिष्ट विचाराभोवती केंद्रित झालेली असतात, तर काही संमेलने ही निव्वळ साहित्याचा उत्सव यापुरतीच र्मयादित असतात. या सगळय़ा साहित्यांच्या प्रवाहामध्ये युवकांच्या साहित्याला योग्य स्थान मिळत नाही. युवकांच्या साहित्याला व्यासपीठ मिळावे, यासाठी अकोल्यातून सुरू झालेले युवा साहित्य संमेलन ही चांगली सुरुवात आहे, असे गौरवोद्गार यावेळी सोनार यांनी काढले. यावेळी त्यांनी सोशल मीडियाचे युवा साहित्याशी असलेले नाते उलगडून सांगतानाच युवकांनी केवळ या माध्यमातच गुरफटून राहू नये, असा सल्लाही दिला. तरुणांनी लेखनातून संवादाचे पूल अधिक बळकट करावे, अशी अपेक्षा व्यक्त करताना, सोनार यांनी तरुणांना माणसांमध्ये मिसळून सामाजिक जाणिवांच्या कक्षा अधिकाधिक रुंदावण्याचे आवाहन केले.उद्घाटन सोहळय़ात प्रा. संतोष हुसे, अँड. पप्पू मोरवाल, संदीप चव्हाण, दिनेश भालतिलक यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रवीण हटकर, संचालन पूजा काळे व गोपाल मापारी यांनी केले.