शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

कधी धावेल वैदर्भीयांची रेल्वे आशेच्या रुळावर?

By admin | Updated: February 24, 2016 01:47 IST

२५ फेब्रुवारीला रेल्वे अर्थसंकल्प; अकोलेकरांच्या अपेक्षा.

अकोला: गेल्या अनेक वर्षांंपासून अकोला-खंडवा मिटरगेज रेल्वे मार्गाच्या गेजपरिवर्तनाचा प्रश्न प्रलंबित आहे. वनविभागाच्या अतिसंरक्षित क्षेत्रातून जाणार्‍या अडगाव (वान) ते तुकईथड या दरम्यानच्या गेजपरिवर्तनास केंद्र तथा राज्य वनविभागाची अद्याप परवानगी मिळालेली नाही. अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांच्या प्रयत्नातून २0१५ च्या अखेरिस केंद्र शासनाने अकोला ते आकोट दरम्यानच्या गेजपरिवर्तनाकरीता ३५ कोटींचा निधी मंजूर केला. त्यातील २९ कोटी दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने अकोला-आकोट दरम्यानच्या जमीन अधिग्रहणापोटी राज्य महसूल विभागास दिले. लवकरच अकोला-आकोट दरम्यान रेल्वे मार्गावरील मोठे पूल उभारणीची ई-निविदा उघडण्यात येणार असल्याची माहिती आहे. एकंदरित पाहता, अनेक वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पास अशंत: का होईना पण चालना मिळाली आहे. गेजपरिवर्तनानंतर वनविभागातील श्‍वापदांना धोका निर्माण होऊ शकतो या जाणिवेने वनविभागाने गेजपरिवर्तना परवानगी नाकारली आहे. यावर पर्याय म्हणून मध्यंतरी दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने हा रेल्वे मार्ग हिवरखेडमार्गे वळविण्याचा प्रस्ताव केंद्राधिकार्‍यांकडे मांडला होता, मात्र सोयीस्कर नसल्याने त्यास देखील परवानगी नाकारण्यात आली. राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेश या चार राज्यांना एकसंध जोडणारा हा मार्ग केवळ अकोला-खंडवा दरम्यान रखडला आहे. देशाच्या हृदयस्थानी थांबलेला हा रक्तप्रवाह केवळ वनविभागाच्या निर्णयानेच सुरळीत होऊ शकतो. राहिला प्रश्न निधीचा, अकोला-आकोट दरम्यानच्या गेजपरिवर्तनासाठी लागणारा निधी गुरूवार, २५ फेब्रुवारी रोजी संसदेत सादर होणार्‍या रेल्वे अर्थसंकल्पात मंजूर होण्याची शक्यता खासदार संजय धोत्र यांनी व्यक्त केली आहे. याव्यतिरिक्त इंग्रजकालीन अचलपूर-मूर्तिजापूर-यवतमाळ या नॅरोगेज रेल्वे मार्गाच्या गेजपरिवर्तनाचा प्रस्ताव देखील केंद्रीय रेल्वे मंत्र्यांच्या कोर्टात आहे. गतवर्षी मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पापर्यंंततरी या मार्गाच्या विस्तारिकरणावर निर्णय झाला नव्हता. यंदा या मार्गाच्या गेजपरिवर्तनाचा मुद्दा सुद्धा रेल्वे अर्थसंकल्पात उपस्थित होईल अशी आशा वैदर्भियांना लागली आहे.