शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारांच्या हालचालींवर राहणार वॉच !

By admin | Updated: September 17, 2014 02:28 IST

अकोला पूर्व मतदारसंघाची आढावा सभा

अकोला: अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या नियुक्त अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी, कार्यालयीन कर्मचारी, आचारसंहिता पथकातील नियुक्त कर्मचार्‍यांच्या मंगळवारी तहसील कार्यालयात झालेल्या सभेमध्ये निवडणूक काळामध्ये उमेदवारांच्या प्रत्येक हालचालींवर वॉच ठेवण्यासाठी १२ पथके तयार करण्यात आली आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी व उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सभा पार पडली. सभेमध्ये निवडणूक काळात उमेदवारांच्या हालचालींवर वॉच ठेवण्यासाठी तीन भरारी पथके, तीन स्टॅटिक सर्व्हेलन्स पथक, व्हिडिओ सर्व्हेलन्स पथक, खर्च नियंत्रण समिती, व्हिडिओ व्हिव्हिंग पथक असे एकूण १२ पथके तयार करण्यात आली. या प थकांच्या माध्यमातून संवेदनशील घटना, मतदारांना पैशांचे आमिष दाखविणे, दारूचे वितरण करणे व इतर साहित्य वितरण करणे, अवैध दारूची वाहतूक, संशयास्पद वस्तू, विनापरवाना शस्त्रसाठा, अवैध पैसा आदींवर लक्ष ठेवून या घटनांविषयी तातडीने वरिष्ठ अधिकार्‍यांना कळविण्याविषयी चर्चा करण्यात आली. सभेमध्ये सर्व क्षेत्रीय अधिकार्‍यांना ३१ अकोला पूर्व मतदारसंघातील सर्व म तदान केंद्र व्यवस्थित आहेत की नाहीत, याबाबतची तपासणी करून अहवाल देण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. ** ३0१ मतदान केंद्रांची २६ झोनमध्ये विभागणीमतदानाच्या प्रक्रियेसाठी ३0१ मतदान केंद्रांची २६ झोनमध्ये विभागणी करण्यात आली. त्यासाठी झोनल ऑफिसर नियुक्त आले असून, त्यांना प्रशिक्षण देण्यात आले व महत्त्वाच्या सूचनासुद्धा देण्यात आल्या. क्षेत्रीय अधिकार्‍यांना अकोला पूर्वमधील सर्व मतदान केंद्र व्यवस्थित आहे की नाहीत, याची तपासणी करून अहवाल देण्याच्या सुचना करण्यात आल्या. **स्टॅटिक सर्व्हेलन्स पथक राहणार चेकपोस्टवर कार्यरतनिवडणूक काळात कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी निवडणूक विभागाच्या वतीने खबरदारी घेण्यात येणार आहे. त्यासाठी स्टॅटिक सर्व्हेलन्स पथक नेमण्यात आले असून, हे पथक मतदारसंघा तील चेकपोस्टवर कार्यरत राहील आणि अवैध दारूची वाहतूक, संशयास्पद वस्तू, विनापरवाना शस्त्रसाठा, अवैध पैसा यावर लक्ष ठेवणार आहे.