शहरं
Join us  
Trending Stories
1
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
3
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
4
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
5
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
6
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
7
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
8
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
9
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
10
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
11
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
12
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
13
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
14
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
15
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
16
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
17
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
18
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
19
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
20
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार

वंचित बहुजन आघाडीचा टक्का वाढणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 21:21 IST

बहुजन वंचित आघाडी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात महत्त्वाची आहे.

- राजरत्न सिरसाट,अकोला: राज्यात तिसरा पर्याय निर्माण करणारे भारिप बहुजन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड़  प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात ४८ जागी उमेदवार उभे करू न महाआघाडी, महायुतीसमोर आव्हान उभे केले. प्रथमच नवीन प्रयोग करीत त्यांनी बलुतेदार, अलुतेदार, वंचितांना प्रतिनिधित्व दिले. हा प्रयोग यशस्वी किती होतो, हे निवडणुकांचा निकाल लागल्याावरच समोर येईल; पण आता तरी राज्यात त्यांनी चुरस निर्माण केली. त्यांच्या सभांना स्वयंस्फूर्तीने मिळणारा प्रतिसाद दखलपात्र नव्हे, तर विचार करायला लावणारा आहे. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत त्यांचा मतदानाचा टक्का वाढणारच असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.त्यामुळे निवडणुकीत वचिंत बहुजन आघाडीच्या कामगीरीकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.   १९८४ मध्ये अकोल्यात पाऊल ठेवल्यानंतर आंबेडकरांनी मागे वळून बघितले नाही. भारतीय रिपब्लिकन पक्षाची चळवळ त्यांनी सुरू  केली. बहुजन समाजाला एकत्र करण्यासाठी त्यांनी त्यानंतर भारतीय रिपब्लिकन पक्ष-बहुजन महासंघ (भारिप-बमसं) नामकरण केले. याच काळात अकोला पॅटर्न उदयास आला. अकोला जिल्हा परिषद, पंचायत समित्या तसेच ग्रामपंचायत काबीज करीत त्यांनी विधानसभेत पाच आमदार निवडून आणले. बाळासाहेब आंबेडकरही अकोल्यातून दोनदा लोकसभेवर निवडून गेले. अकोल्यात त्यांनी केलेले ‘सोशल इंजिनिअरिंग’ पश्चिम विदर्भात रुजू लागले. हा प्रयोग चळवळीला राज्यात व्यापक स्वरू प प्राप्त करू न देण्यासाठी आंबेडकरांना ३५ वर्षे खर्ची घालावी लागली. मागील वर्षी त्यांनी बहुजन वंचित आघाडी निर्माण करू न चळवळीला नवीन धार निर्माण केली. पंढरपूरला धनगर समाजाच्या मेळाव्यात निर्धार क रीत राज्यातील वंचितांना सोबत घेऊन त्यांनी वादळ निर्माण केले. त्यांच्या सभांना होणारी गर्दी, मुंबईतील शिवाजी पार्कची सभा ही लक्षवेधी ठरली. वंचितांचा वाढता सहभाग बघता, त्यांनाही प्रतिनिधित्व मिळावे म्हणून त्यांनी कोणत्याही पक्षासोबत युती न करता ४८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आणि त्या समाजामध्ये चैतन्य निर्माण के ले. त्यांच्या या भूमिकेवर मात्र टीका करणाºयांची यादी वाढत गेली; पण आंबेडकर त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत. वंचितांना त्यांच्या अधिकाराची जाणीव व्हावी, असा त्यांचा उद्देश आहे.     राज्यातील ४८ मतदारसंघांतील उमेदवार व उमेदवारी अर्ज भरण्यासाठी त्यांच्यासोबत स्वयंस्फूर्तीने जाणाºया कार्यकर्त्यांची गर्दी बघितल्यास यावेळी बहुजन वंचित आघाडीचा मतदानाचा टक्का वाढेल, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुका आहेत. विधानसभा निवडणूक  खºया अर्थाने त्यांचे लक्ष्य आहे. त्यानुषंगाने त्यांचे नियोजन असल्यास वंचित बहुजन आघाडीतील वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेतून हे लक्षात येते. विधानसभा निवडणुकीची ही त्यांची लिटमस टेस्ट असल्याचे वरिष्ठ कार्यकर्ते बोलतात. त्याच अनुषंगाने ही बांधणी आहे. राज्यात बॅ. असुदुद्दीन ओवैसी यांच्या एक-दोन सभा वगळता अ‍ॅड़  बाळासाहेब आंबेडकरांकडेच प्रचाराची धुरा आहे. ओवैसींच्या ‘एमआयएम’सोबतची युती ही मुस्लीम मतांची मोट बांधण्याचा हा त्यांचा प्रयोग आहे. हाच प्रयोग विधानसभेतही राहणार असल्याने विधानसभेत तर नक्कीच वेगळे करू न दाखवू, असे वंचित बहुजन आघाडीला वाटते.

टॅग्स :AkolaअकोलाVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी