शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राण्यांचा धुमाकूळ; पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांचा शेतात मुक्काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:15 IST

देवानंद आग्रे रोहनखेड : अकोट तालुक्यातील कुटासा, बांबर्डा, रोहनखेड परिसरात सद्य:स्थितीत पिके बहरली आहेत. पिकांमध्ये वन्यप्राणी धुमाकूळ घालीत असल्याने ...

देवानंद आग्रे

रोहनखेड : अकोट तालुक्यातील कुटासा, बांबर्डा, रोहनखेड परिसरात सद्य:स्थितीत पिके बहरली आहेत. पिकांमध्ये वन्यप्राणी धुमाकूळ घालीत असल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वन्यप्राणी पिके फस्त करीत असल्याने शेतकरी चिंतित आहे. पिके वाचविण्यासाठी काही शेतकरी रात्री शेतातच मुक्काम करीत असल्याचे चित्र रोहनखेड परिसरात दिसून येत आहे.

परिसरात पावसाने उशिरा हजेरी लावल्याने पेरणी उशिरा झाली. सध्या चांगला पाऊस बरसत असल्याने शेतात पिके बहरली आहेत, तसेच काही शेतकरी दुबार पेरणी करीत आहेत. अशातच दिवसभर काम करूनही शेतकऱ्यांना रात्री जागरण करावे लागत असल्याचे चित्र आहे. परिसरात पिके कोवळी असून, वन्यप्राणी शेतात शिरून नासधूस करीत असल्याचे चित्र आहे. पिके वाचविण्यासाठी शेतकरी रात्रीच्या सुमारास शेतात मुक्काम करून पिकांचे संरक्षण करीत असल्याचे चित्र आहे.

---------------------

वन्यप्राण्यांचा हैदोस वाढला असून, ते शेतात उगवलेले बियाणे फस्त करीत आहेत. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्याला मदत द्यावी. पिकाला वाचवण्यासाठी शेतात रात्रीचे जागरण करावे लागत आहे.

-ज्ञानेश्वर विजय झामरे, शेतकरी रोहनखेड

-----------------

रात्रीचा हैदोस वाढला

परिसरात पाऊस चांगला बरसत असल्याने पिके बहरली आहेत. वन्यप्राणी शेतात हैदोस घालून पिकांचे नुकसान करीत आहेत. रात्रीच्या सुमारास वन्यप्राण्यांचे कळप शेतात जात असल्याने शेतकरी शेतात मुक्काम करीत आहेत.

-------------------

शेतकऱ्यांचा जीव धोक्यात

रात्रीच्या सुमारास शेतकरी राखणीला जात असल्याने शेतकऱ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. रात्रीच्या सुमारास सरपटणारे प्राणी, रानडुक्कर यांचा धोका अधिक आहे. त्यामुळे वन विभागाने याकडे लक्ष देऊन वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.