शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीला पतीनेच जिवंत जाळले!

By admin | Updated: February 3, 2017 00:13 IST

चोहोट्टाबाजार परिसरात खळबळ; पतीस अटक

चोहोट्टा बाजार (जि. अकोला), दि. १-येथून जवळच असलेल्या करतवाडी रेल्वे येथे एका विवाहित महिलेला तिच्या पतीने जिवंत जाळल्याची अमानवी घटना मंगळवार, ३१ जानेवारीच्या रात्री १२ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे चोहोट्टा बाजार परिसरात खळबळ उडाली.करतवाडी रेल्वे येथील रहिवासी असलेला आरोपी आकाश ऊर्फ अशोक किरडे (४0) याने आपल्या मंगला (३८) नमाक पत्नीला आपल्या घरातच दोरीने बांधून जिवंत जाळले. या घटनेत पूर्णपणे भाजलेल्या मंगलाचा जागेवरच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच दहीहांडा पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला आणि प्रेत उत्तरीय तपासणीकरिता अकोला येथे पाठविले. मृत मंगलाचे मावसे सुरेश एकीरे यांच्या फिर्यादीवरून दहीहांडा पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३0२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार वनारे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय दोनकलवार, पोहेकॉं. वाघळकर, इंगळे, ठाकूर करीत आहेत. याप्रकरणी आरोपी आकाश किरडे यास न्यायालयात उभे केले असता, न्यायाधिशांनी त्यास ३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. चिमुकलीचे मातृत्व हरविलेया घटनेत मृत पावलेल्या मंगला नामक महिलेला तीन चिमुकल्या मुली आहेत. वडिलांच्या अमानवी कृत्यामुळे तिघींवरही दु:खाचा डोंगर कोसळला आहे.