शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

कन्या भ्रूणहत्येवर ‘ती एकाकी का?’ने दिली सणसणीत चपराक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 14:32 IST

तिला जन्मत:च सोडून जाणाºया आई-बापावर पुढे काय प्रसंग गुजरतो, याचे सुंदर आणि मन हेलावून टाकणारे चित्रण या नाटकातील बालकलावंतांनी केले.

अकोला: आम्हाला मुलगी नको, मुलगाच हवा, अशी मनीषा बाळगणाऱ्यांना आणि कन्या भ्रूणहत्या करणाºया समाजाला ‘ती एकाकी का?’ या बालनाट्याने सणसणीत चपराक लगावण्याचे काम केले. श्री समर्थ पब्लिक स्कूलने शुक्रवारी हे नाटक सादर करू न ‘मुलगी वाचवा’चा संदेश दिला.आपल्याला मुलगाच हवा मुलगी नको, अशी इच्छा बाळगणाºया एका कुटुंबाच्या पदरी मुलगी पडते. त्यामुळे तिला जन्मत:च सोडून जाणाºया आई-बापावर पुढे काय प्रसंग गुजरतो, याचे सुंदर आणि मन हेलावून टाकणारे चित्रण या नाटकातील बालकलावंतांनी केले. यातील परीची भूमिका करणाºया संस्कृती सानप या बालिकेने अतिशय अप्रतिम अभिनय करू न प्रेक्षकांची दाद मिळविली. एखाद्या व्यावसायिक नाटकात मोठ्या कलावंताचा सहज अभिनय करावा, एवढा सहज अभिनय या नाटकातील चिमुकल्यांनी केला. उत्कृष्ट नेपथ्य, मांडणी, उत्कृष्ट प्रकाश योजना व संगीत या नाटकाच्या जमेच्या बाजू होत्या. प्रा. नितीन बाठे यांनी निर्मित केलेल्या व अनुप बाजड यांनी लेखन व दिग्दर्शन केलेल्या या नाटकाला मुख्याध्यापक रिता घोरपडे यांच्या मार्गदर्शन लाभले. नाटकात संस्कृती सानप, कोमल गाडे, ओम शनिवारे, कल्याणी गावंडे, श्लोक चव्हाण, अविनाश पोरे, भक्ती ठाकूर, आर्या राऊत, संस्कृती मोहोड, कल्याणी गावंडे, स्वरा कोरपे, सिद्धी खंडेझोड, ओम ठोंबरे, समृद्धी वाढे, नंदिनी खडसे, आकाश बनसोडे व ऋषिकेश अंधाळे या बालकलावंतानी उत्कृष्ट भूमिका वठविल्या.शुक्रवारी स्पर्धेच्या तिसºया दिवशी एकूण आठ नाटके सादर करण्यात आली. यामध्ये ‘ती एकाकी का?’ या नाटकासह पंचनामा -ज्युबिली हायस्कूल, नळावरची झोंबाझोंबी -ब्ल्यु लोटस प्राथमिक शाळा, गाथा शेतकऱ्यांची- भारत विद्यालय, अंतराळ वेध- श्री रामकृष्ण क्रीडा विद्यालय अमरावती, अतिथी देवो भव- बालशिवाजी शाळा, पाणी बचाओ जीवन बचाओ- बालविकास कर्णबधिर शाळा व चवदार पाणी- जे आर डी टाटा स्कूल या नाटकांचा समावेश होता.नाटकांचे सादरीकरण झाल्यानंतर स्पर्धेचे परीक्षक गिरीश फडके, धनंजय सरदेशपांडे, यतीन माझीरे यांनी बालनाट्य एकांकिका कशा सादर कराव्या व त्याची गुणवत्ता कशी वाढवावी, याबाबत मार्गदर्शन केले. सायंकाळी परीक्षक धनंजय सरदेशपांडे यांनी ‘खूपच टोचलंय’ ही एकांकिका सादर करू न प्रेक्षकांची मने जिंकली. उद्या, शनिवारी स्पर्धेचा समारोप असून, त्यापूर्वी ‘ये जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या विषयावर मनीष सेठी यांचे व्याख्यान होणार आहे. 

 

टॅग्स :Akolaअकोलाcultureसांस्कृतिक