शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आजपर्यंत मानसेवी कर्मचाऱ्यांचे समायाेजन का केले नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:14 IST

मनपाच्या प्रभारी आयुक्त निमा अराेरा यांनी सात कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा बंद केली हाेती. या कर्मचाऱ्यांमध्ये लाेकप्रतिनिधी तसेच राजकीय पदाधिकाऱ्यांच्या ...

मनपाच्या प्रभारी आयुक्त निमा अराेरा यांनी सात कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा बंद केली हाेती. या कर्मचाऱ्यांमध्ये लाेकप्रतिनिधी तसेच राजकीय पदाधिकाऱ्यांच्या अत्यंत निकटवर्तीयांचा समावेश हाेता. मनपात एकहाती सत्ता असताना देखील मर्जीतल्या सात कंत्राटी कर्मचाऱ्यांसह १४ कंत्राटी आराेग्य निरीक्षकांना सेवेतून कमी केल्यामुळे सत्तापक्षात प्रशासनाविराेधात असंताेष निर्माण झाला हाेता. यादरम्यान, मनपामध्ये १९९८ पासून सेवारत असलेल्या ११५ मानसेवी कर्मचाऱ्यांना दर सहा महिन्यांसाठी मुदतवाढ दिली जाते. यापूर्वी हा प्रस्ताव प्रशासनाकडून मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेकडे सादर केला जात हाेता. आयुक्त अराेरा यांनी हा प्रस्ताव पहिल्यांदा स्थायी समितीकडे पाठवला. आयुक्त अराेरा यांनी सात कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा बंद केल्याचा राेष मनात ठेवत भाजपने ११५ मानसेवी कर्मचाऱ्यांपैकी दाेन कर्मचाऱ्यांची सेवा बंद करण्यासाेबतच पुन्हा सात कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत घेण्याचा ठराव मंजूर केला. हा ठराव आयुक्तांनी विखंडनासाठी शासनाकडे सादर केला.

जाणीवपूर्वक तांत्रिक पेच निर्माण केला !

प्रभारी आयुक्त अराेरा मानसेवी कर्मचाऱ्यांना कमी केल्याचा ठराव मान्य करणार नाहीत, याची जाणीव असलेल्या स्थायी समितीने त्या ठरावात कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत घेण्याचा समावेश केला. यामुळे तांत्रिक पेच निर्माण झाला. आयुक्तांनी ११५ मानसेवी कर्मचाऱ्यांना वगळून इतर सात कर्मचाऱ्यांचा ठराव विखंडित करण्याची शासनाकडे मागणी केली.

सामान्य प्रशासन विभागाची दिरंगाई

मनपाच्या आस्थापनेवरील तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील अनेक पदे रिक्त आहेत. ११५ मानसेवी कर्मचाऱ्यांचे बिंदूनामावलीनुसार समायाेजन करणे शक्य आहे. त्यामुळे यासंदर्भात स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याचे निर्देश नगर विकास विभागाने दिले आहेत. निर्देश प्राप्त हाेऊन अनेक दिवसांचा अवधी उलटून गेला असला तरी अद्यापपर्यंत सामान्य प्रशासन विभागाने आयुक्तांसमाेर अहवाल सादर केला नाही, हे येथे उल्लेखनीय.