शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
3
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
4
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
5
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
6
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
7
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
8
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
9
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
10
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
11
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
12
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
13
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
14
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
15
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
16
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
17
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
18
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
19
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम

मराठा समाजावरच अन्याय का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:19 IST

सध्याच्या राजकारणात मोजका मराठा समाज आहे. जे पाच-दहा टक्के मराठा समाज राजकारणात सक्रिय आहे, ती मोठी घराणी आहेत. त्यावरून ...

सध्याच्या राजकारणात मोजका मराठा समाज आहे. जे पाच-दहा टक्के मराठा समाज राजकारणात सक्रिय आहे, ती मोठी घराणी आहेत. त्यावरून संपूर्ण मराठा समाजाच्या परिस्थितीची जाणीव होत नाही. सध्या बहुतांश मराठा समाज हा हलाकीच्या परिस्थितीत जीवन जगत आहे. देशात आज अनेक राज्यात अवांतर ५० टक्के पेक्षा अधिक आरक्षण आहे. मग एकट्या मराठा समाजावरच देशभरात अन्याय करण्याचे काय कारण आहे? या अन्यायाविराेधात लवकरच आक्रमक भूमिका सरकारला बघायला मिळेल.

डाॅ. अभय पाटील, मराठी क्रांती माेर्चा समन्वयक

....................................

५८ क्रांती माेर्चे, कायदेशीर लढाई, अनेक तरुणांचे बलिदान, मागासवर्गीय आयाेगाने नाेंदविलेले निरक्षण याबाबत बाजू मांडण्यात सरकारला अपयश आलेले आहे. अनेक राज्यांनी ५० टक्केपेक्षा अधिक आरक्षण मर्यादा ओलांडली आहे, त्यामुळे मराठा आरक्षणासाठीच काेलदांडा का? आणखी किती आक्रमक हाेणे अपेक्षित आहे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे म्हणजे शेतकरी कष्टकरी व लढवय्या समाजावर केलेल्या अन्याय आहे.

अशाेक पटाेकार, जिल्हा अध्यक्ष मराठा सेवा संघ अकाेला

...................................

समाजाचा अपेक्षाभंग झाला इतर राज्यात ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली असतांना ते रद्द न करता महाराष्ट्र राज्यातील मराठा समाजाला वेगळा न्याय का? हा मुद्धा पटवून देण्यात राज्य शासन तसेच केंद्र शासन कमी पडले, त्यास दोन्ही शासन जबाबदार आहेत, त्यामुळे पुनर्याचिका दाखल करा किंवा अजून काय ती कायद्यात दुरुस्ती करता येईल ते करा, आता ही दोन्ही शासनाची संयुक्त जबाबदारी आहे. ५८ मोर्चे आणि ४२ तरुणांचं बलिदान हे वाया जाता कामा नये. यासाठी समाज आता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.

- विनायकराव पवार, उपाध्यक्ष, अखिल भारतीय मराठा महासंघ.

............................................

मराठा समाजाला आरक्षणाच्या नावावर झुलवत ठेऊन त्यांच्यासोबत आरक्षण तर नाहीच नुस्ता खोडसाळपणा होत आला आहे.

जी गोष्ट टिकणारी नाही संवैधानिक किंवा कायदेशीर नाही ते आरक्षण लागू करून सर्वच पक्षाच्या राज्यकर्त्या मंडळींनी मराठा समाजाला खेळवत ठेवले आहे.

मुळात मराठा समाजाला ओबीसी कोठ्यातून सर्वत्र टिकणारे कायदेशीर आरक्षण देणे राज्यकर्त्यांची जबाबदारी होती.

अविनाश पाटील नाकट

............................................

मराठा आरक्षणच्या प्रकरणात केंद्र व राज्य सरकार दाेन्हीही अपुरे पडले. मराठा समाज आरक्षणाची मागणी अतिशय संयुक्तिक आहे या निकालामुळे समाजमन अस्वस्थ असून लवकरच आक्रमक भूमिका घेण्याबाबत निर्णय घेतल्या जाईल.

कृष्णा अंधारे, जिल्हाध्यक्ष अ.भा.मराठा महासंघ अकाेला तसेच राज्य समन्वयक मराठा क्रांती माेर्चा

......................................

सर्वोच न्यायालयाचा हा निकाल गरीब मराठ्यांसाठी अतिशय दुर्दैवी आहे. श्रीमंत मराठ्यांच्या तुलनेत आपण सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहोत ही जाणीव जोपर्यंत गरीब मराठ्यांमध्ये निर्माण होत नाही तोपर्यंत त्याला आरक्षण मिळणार नाही. गरीब मराठ्यांनी आता स्वतःची वेगळी राजकीय ओळख निर्माण करावी.

डॉ. धैर्यवर्धन पुंडकर

प्रदेश उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र

.....................

राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत न्यायालयात बाजू मांडण्यात अपयशी ठरले आहे. सरकारकडून जाे समन्वय हाेणे अपेक्षित हाेते ताेही झालेला नाही. आगामी काळात चुका दुरूस्त करून मराठा समाजाच्या अतिशय जिव्हाळ्याच्या या प्रश्नावर सरकारने याेग्य भूमिका घ्यावी. भाजपाच्या वतीने आरक्षणची लढाई अधिक तीव्र केली जाईल.

डाॅ. रणजित पाटील, माजी मंत्री

.....................................

भाजप सरकारने उच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकवले होते. बत्तीस टक्के समाज मागास ठरतो त्यावेळी असाधारण परिस्थिती म्हणून पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडावी लागते, हे भाजप सरकारने उच्च न्यायालयाला यशस्वीरित्या पटवून दिले. परंतु, नेमका हाच असाधारण परिस्थितीचा मुद्दा महाविकास आघाडी सरकार सर्वोच्च न्यायालयासमोर प्रभावीपणे मांडू शकले नाही आणि मराठा समाजाने आरक्षण गमावले.

रणधीर सावरकर आमदार जिल्हाध्यक्ष भाजप

.......................................

मराठा आरक्षणाचा सर्वोच्च न्यायालयात बचाव करण्यात राज्यातील सत्ताधारी आघाडी सरकारला पूर्ण अपयश आले असून आघाडी सरकारमुळे मराठा समाजाने शिक्षण व नोकरीतील आरक्षण गमावले आहे. यामुळे मराठा तरुण तरुणींच्या आयुष्यात अंधार निर्माण झाला असून मराठा समाज महाविकास आघाडी सरकारला माफ करणार नाही.

गाेर्वधन शर्मा आमदार

...............................

गेल्या वर्षी आधी सर्वोच्च न्यायालयाकडून मराठा आरक्षणाला स्थगिती आली व आता तर हे आरक्षण रद्दच झाले आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत महाविकास आघाडी सरकार गंभीर नव्हते. मराठा आरक्षण न्यायालयात टिकविण्यासाठी समन्वय नव्हता.

प्रकाश भारसाकळे आमदार

.................................

मराठा आरक्षणाची बाजू मांडताना देवेंद्र फडणवीस यांनी समाजाची दिशाभूल केली. आज परत ते दिशाभूल करताहेत. सरकार पाडण्यासाठी जिवाच्या आकांताने दिल्ली स्वारी करणाऱ्या फडणवीस साहेबांनी इतकीच प्रामाणिक मेहनत आरक्षणासाठी घेतली असती, केंद्र सरकारला चुकीचे ब्रिफिंग केले नसते तर आज मराठा समाजावर अन्याय झाला नसता

अमाेल मिटकरी, आमदार

..................................