शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

ठोक भाजी बाजार हलविणार!

By admin | Updated: March 3, 2017 01:57 IST

होलसेल किराणा बाजाराच्या मागील बाजूस घेतली चार एकर जागा

संजय खांडेकरअकोला, दि.२ : जनता बाजारातील होलसेल (ठोक) भाजी बाजार बाळापूर मार्गावर हलविण्याची प्रक्रियेला वेग आला असून येथील ३५ अडत व्यापाऱ्यांनी लक्षावधीचा निधी गोळा करून चार एकराचा भूखंड नवीन बाजाराच्या विस्तारीकरणासाठी घेतला आहे.अकोल्यातील ठोक भाजीबाजार गत अनेक वर्षांपासून शासकीय विश्रामगृहासमोरील जनता बाजारात भरतो. जवळपास चाळीस अडत दुकानदारांनी मिळून येथे महात्मा फुले भाजीपाला अडत दुकानदार असोसिएशन स्थापन केलेली आहे. अकोला, बुलडाणा, वाशिम आणि जवळपासचे शेतकरी फळ- भाजीपाला या ठोक बाजारात आणून विकतात. मध्यरात्रीपासून पहाटे सहा वाजेपर्यंत येथे कायम वर्दळ असते. दररोज कोट्यवधीची उलाढाल या बाजारातून होते. दररोज अनेक टन कचरा फेकला जात असल्याने महापालिका प्रशासनाला कचरा उचलण्यासाठी विशेष यंत्रणा लावावी लागते. अतिक्रमित केलेल्या जागेवर महिन्याभरापूर्वी महापालिकेने गजराज फिरविल्याने व्यापाऱ्यांचा लाखोंचा व्यवसाय धोक्यात आला. अतिक्रमित जागा हक्काची असू शकत नसल्याने अडत दुकानदारांनी निधी गोळा करून स्वतंत्र्य बाजारपेठ निर्माण करण्यास सुरुवात केली; मात्र त्यात एकमत न झाल्याने असोसिएशनचे अध्यक्ष सज्जाद हुसेन आणि उपाध्यक्ष राजेश दाहे यांच्यात दोन गट पडले. हुसेन यांच्या गटाने आहे त्याच ठिकाणी राहण्यास संमती दर्शविली आहे. तर राजेश दाहे अधिक ३५ सदस्यांनी एकत्रित येऊन भाजीपाल्याची ठोक बाजारपेठ येथून हलविण्यास सुरुवात केली. याबाबत हुसेन यांना विचारणा केली असता, त्यांनी या बाबीस दुजोरा दिला. बाळापूर मार्गावरील नवीन होलसेल किराणा बाजाराच्या मागील बाजूस खरप रोडवर या सदस्यांनी चार एकरचा मोठा भूखंड विकत घेतला आहे. या भूखंडावर इमारत बांधून ठोक भाजी बाजार सुरू करण्याचा विचार सुरू आहे. दरम्यान, या बाजारासाठी भाजपच्या खासदार-आमदारांनी निधी द्यावा म्हणून पदाधिकाऱ्यांनी गळ घालणे सुरू आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीदेखील बाजारपेठेच्या समर्थनार्थ सहकार्य करण्याचे अश्वासन दिल्याचे समजते. त्यामुळे बाळापूर मार्गावर नवीन होलसेल किराणा बाजाराच्या पाठोपाठ आता ठोक भाजी बाजारही आपले हक्काचे ठिकाण विकसित करीत आहे. वाहतुकीची कोंडी सुटेलजनता बाजारातील ठोक भाजी बाजार अकोला शहराच्या बाहेर गेल्यास शहरातील वाहतुकीची कोंडी सुटेल. याचा फायदा सर्वसामान्य अकोलेकरांना होईल. चिल्लर भाजीबाजार तेवढा शहरात राहणार असल्याचे चिन्ह तूर्तास दिसत आहेत.