शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश नसतानाही होलसेल किराणा बाजार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 11:21 IST

किराणा बाजार व शहराच्या मध्यवर्ती भागातील मुख्य बाजारपेठ बंद ठेवण्यात आल्याचा प्रकार समोर आला.

अकोला : राज्य सरकारने २३ मार्च रोजी जाहीर केलेल्या संचारबंदीच्या कालावधीत अत्यावश्यक सेवा म्हणून औषधी, किराणा व्यावसायिकांना व्यवसाय सुरू ठेवण्याची मुभा दिली आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशातून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर प्रभावी उपाययोजनांची अंमलबजावणी करीत आहेत. यादरम्यान, शहरातील होलसेल किराणा बाजार असो वा घाऊक किराणा दुकानांना बंद करण्यासंदर्भात जिल्हाधिकाºयांचा कोणताही आदेश नसताना मंगळवारी राष्ट्रीय महामार्गालगतचा होलसेल किराणा बाजार व शहराच्या मध्यवर्ती भागातील मुख्य बाजारपेठ बंद ठेवण्यात आल्याचा प्रकार समोर आला.देशासह राज्यात संसर्गजन्य कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारकडून नागरिकांना गर्दी टाळण्यासाठी सातत्याने आवाहन केले जात आहे. सरकारच्या आवाहनाला काही नागरिक जुमानत नसल्याचे पाहून अखेर संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे व त्यांची चमू रात्रंदिवस या घडामोडींवर लक्ष ठेवून असल्याचे दिसून येत आहे. संचारबंदीच्या कालावधीत अत्यावश्यक सेवेत सामील असलेल्या किराणा व औषधी व्यावसायिकांना व्यवसाय सुरू ठेवण्याचे राज्य शासन व जिल्हाधिकाºयांचे स्पष्ट निर्देश असताना शहरातील होलसेल किराणा मर्चंट असोसिएशन व मध्यवर्ती भागातील घाऊक किराणा व्यावसायिकांनी त्यांची बाजारपेठ बंद ठेवल्याचा प्रकार समोर आला. पोलीस कारवाईच्या भीतीपोटी होलसेल किराणा मार्केट बंद ठेवल्याची बाब उजेडात आली आहे. या गंभीर प्रकाराची जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी तातडीने दखल घेतली आहे.

औषधी विके्रत्यांना धास्ती का नाही?संचारबंदी लागू झाल्यानंतरही शहरातील औषधी व्यावसायिकांची दुकाने उघडी आहेत. मंगळवारी सकाळी काही औषधी दुकानातील कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अडवल्यानंतर दवा बाजारच्या संचालकांनी व औषधी व्यावसायिकांनी यावर तोडगा काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे धाव घेतली. जिल्हा प्रशासनाने यावर तातडीने तोडगा काढला. तसा प्रयत्न होलसेल किराणा मर्चंट असोसिएशनने का केला नाही, असा सवाल उपस्थित झाला आहे.जुने शहरात पुरवठा ठप्पजुने शहरातील बहुतांश किराणा व्यावसायिकांना मध्यवर्ती बाजारपेठेतील रिटेल व घाऊक किराणा बाजारातून अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करताना संबंधित व्यापाºयांनी हात आखडता घेतल्याची धक्कादायक माहिती आहे. यामुळे पुढील आठ दिवसांत जुने शहरात अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे. या प्रकाराची जिल्हाधिकारी तसेच जिल्हापुरवठा अधिकाºयांनी गंभीर दखल घेण्याची गरज आहे.जिल्हा असो वा शहरातील किराणा मार्केट, औषधी व्यावसायिकांना व्यवसाय करण्याची मुभा आहे. पोलीस कारवाईच्या भीतीपोटी होलसेल किराणा मार्केट बंद ठेवण्याची बाब पटण्यासारखी नाही. शहरात अन्नधान्य, औषधी व जीवनावश्यक वस्तूंचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाल्यास संबंधितांची खैर नाही.- जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारीसंचारबंदीमुळे शहरात ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात आहे. कारवाईच्या भितीपोटी व्यापारी दुकाने उघडण्यास धजावत नसल्याची परिस्थिती आहे. किराणा बाजार सुरु करण्यासंदर्भात जिल्हा पुरवठा अधिकाºयांसोबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल.-कासम अली नानजी भाई, अध्यक्ष होलसेल किराणा मर्चंट असोसिएशन

 

टॅग्स :AkolaअकोलाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस