शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

संपूर्ण अकोला जिल्हा कोरोनाच्या कक्षेत; दिवसभरात एकाचा मृत्यू; १८ नवे पॉझिटिव्ह, एकूण रुग्ण ४१५

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 19:32 IST

सोमवार, २५ मे रोजी दिवसभरात एका महिलेचा मृत्यू, तर १८ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली.

ठळक मुद्देएकही रुग्ण नसलेल्या अकोट शहरातही कोरोनचा शिरकाव झाला आहे. दिवसभरात एका महिलेचा मृत्यू, तर १८ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. जिल्ह्यातील आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४१५ झाली आहे.

अकोला: शहरातील सर्वच प्रभागांमध्ये पाय पसरलेल्या कोरोनाच्या कक्षेत आता संपूर्ण जिल्हा आला असून, आतापर्यंत एकही रुग्ण नसलेल्या अकोट शहरातही कोरोनचा शिरकाव झाला आहे. सोमवार, २५ मे रोजी दिवसभरात एका महिलेचा मृत्यू, तर १८ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. जिल्ह्यातील आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४१५ झाली आहे. तर मृतकांचा आकडाही २५ झाला आहे. दरम्यान, आणखी २२ जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे सद्यस्थितीत १३९ रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.मे महिन्याच्या पहिल्या तारखेपासून कोरोनाच्या संक्रमनाने वेग घेतला असून, रविवार, २४ मे रोजी जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३९७ वर पोहचली होती. यामध्ये सोमवारी आणखी नवीन १८ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. रविवारी सकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेकडून एकूण २७७ संदिग्ध रुग्णांची कोरोना चाचणीचे अहवाल प्राप्त झाले. यापैकी २५९ अहवाल निगेटिव्ह असून, उर्वरित १८ अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले आहे. यामध्ये ११ पुरुष व सात महिला रुग्णांचा समावेश आहे.सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या ९ रुग्णांपैकी तीन जण हे फिरदौस कॉलनी येथील रहिवासी आहेत. तर अन्य महसूल कॉलनी, अण्णाभाऊ साठे नगर अकोट फैल, देशमुख फैल, अकोट फैल, मोहता मिल नानकनगर, गोकुळ कॉलनी, अकोट येथील रहिवासी असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. सायंकाळी पॉझिटीव्ह आलेल्या नऊ रुग्णांपैकी दोन जण हे न्यु राधाकिसन प्लॉट येथील रहिवासी आहेत. तर अन्य रणपिसेनगर, गोरक्षण रोड, पावसाळे ले आऊट कौलखेड रोड, सिंधी कॅम्प, शिवर, बाळापूर व पातुर येथील रहिवासी आहेत. दरम्यान, मोहम्मद अली रोड परिसरातील एका ४० वर्षीय महिलेचा रविावारी उपचार घेताना मृत्यू झाला. या महिलेला शनिवार, १९ मे रोजी दाखल करण्यात आले होते. २३ मे रोजी तिचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. कोरानाबाधितांच्या मृत्यूचा आकडाही २५ वर पोहचला आहे. यामध्ये एका कोरोनाबाधिताने आत्महत्या केली आहे. आतापर्यंत २५१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून, आता १३९ रुग्ण उपचारार्थ दाखल आहेत.रविवारी २२ जणांना ‘डिस्चार्ज’एकीकडे कोरोनाच्या कचाट्यात सापडणाऱ्यांची संख्या वाढत आहे. तर दुसरीकडे कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. रविवारी रात्री एकूण २२ जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यापैकी तीघांना घरी पाठविण्यात आले. तर उर्वरित १९ जणांना संस्थागत अलगिकरणात निरीक्षणात ठेवण्यात आले आहे.प्राप्त अहवाल-२७७पॉझिटीव्ह-१८निगेटीव्ह-२५९आता सद्यस्थितीएकूण पॉझिटिव्ह अहवाल- ४१५मयत-२५(२४+१),डिस्चार्ज-२५१दाखल रुग्ण (अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१३९

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या