शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पांढरं सोनं भिजलं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 01:28 IST

अकोला : विदर्भात दोन दिवसांपासून पाऊस सुरू  असल्याने हाती आलेलं पांढरं (कापूस) सोनं भिजलं असून, यामुळे  वेचणीला आलेल्या कापसाचे सर्वाधिक नुकसान पश्‍चिम वर्‍हाडात झाले.

ठळक मुद्देपावसामुळे नुकसान, शेतकरी हवालदिल

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : विदर्भात दोन दिवसांपासून पाऊस सुरू  असल्याने हाती आलेलं पांढरं (कापूस) सोनं भिजलं असून, यामुळे  वेचणीला आलेल्या कापसाचे सर्वाधिक नुकसान पश्‍चिम वर्‍हाडात झाले.पश्‍चिम विदर्भात गतवर्षीच्या तुलनेत कापसाचे क्षेत्र यावर्षी वाढले असून, ९२ टक्के क्षेत्रावर कपाशीची पेरणी करण्यात आली आहे. गतवर्षी ८ लाख ६१ हजार ३00 हेक्टर म्हणजे ७९ टक्केच पेरणी झाली होती. यावर्षी ९ लाख ९६ हजार १७ हेक्टर म्हणजेच ९२ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यात सर्वाधिक यवतमाळ जिल्हय़ात ४ लाख ७0 हजार ३१५ हेक्टरवर म्हणजेच १0४ टक्के , अमरावती जिल्हय़ात २ लाख ७ हजार ४५७ हेक्टर, बुलडाणा १ लाख ७५ हजार 0५ हेक्टर, अकोला १ लाख १२ हजार ३१९ हेक्टर, तर वाशिम जिल्हय़ात ३0 हजार ९२१ हेक्टरवर   पेरणी झाली आहे. यावर्षी मान्सूनचा पाऊस उशिरा आल्याने पेरण्या उशिरा झाल्या आहेत. त्यानंतर पावसाचा खंड पडला पण, असे असतानाही कपाशीचे पीक जोरदार आले आहे. दसर्‍याला विदर्भात ‘सीतादही’ म्हणजेच कापसाच्या शेतात पूजा करू न वेचणी केली जाते. यावर्षी मान्सूनपूर्व कापूस वेचणीला आला आहे. खरीप हंगामातील ज्या शेतकर्‍यांनी जूनमध्ये पेरणी केली, तेथेही कापूस वेचणीला आला आहे. पण गत दोन दिवसांपासून पाऊस सुरू  असल्याने हाती आलेल्या या पांढर्‍या सोन्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. मूग, उडीद, सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले आहे. यासर्व पिकांची कसर कापूस पीक भरू न काढेल, अशी अपेक्षा होती; पण आज आलेला पाऊस तोंडचा घास हिरावून घेत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

शेतकर्‍यांनी कापूस वेचून घ्यावा, ओट्यावर टाकून ताडपत्रीने झाकून घ्यावे, झाडं मोठी असतील तसेच पर्‍हाटीच्या फांद्या जमिनीवर लोळत असतील, तर त्यासाठीची उपाययोजना करू न झाडांना उंच बांधण्याची सोय करावी, शेतात पाणी साचले असल्यास चर काढून पाणी बाहेर काढावे. - डॉ. व्ही.एम.भाले,कूलगुरू,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.