शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सरकार कोणाचंही असो; गरिबांचं भलं करा; अकोला -मूर्तिजापूर बसमधील मतदार प्रवाशांचा कौल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 12:38 IST

अकोला : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत कोणाचेही सरकार सत्तेत येऊ द्या; पण सत्तेवर येणाऱ्या सरकारने गरिबांचं भलं केलं पाहिजे, असा कौल अकोला ते मूर्तिजापूर एसटी बसमधील मतदार प्रवाशांनी सोमवारी ‘लोकमत’शी गप्पा मारताना दिला.

अकोला : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत कोणाचेही सरकार सत्तेत येऊ द्या; पण सत्तेवर येणाऱ्या सरकारने गरिबांचं भलं केलं पाहिजे, असा कौल अकोला ते मूर्तिजापूर एसटी बसमधील मतदार प्रवाशांनी सोमवारी ‘लोकमत’शी गप्पा मारताना दिला.१ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास राज्य परिवहन महामंडळाच्या अकोला आगारातून एमच १४ बीटी-४८२६ क्रमांकाची अकोला ते मूर्तिजापूर बस निघाली. या बसमध्ये बसलेले ३९ प्रवाशांनी लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार असल्याचे सांगीतले. अकोला ते मूर्तिजापूर ४५ किलोमीटरच्या प्रवासादरम्यान बसमधील प्रवाशांच्या अपेक्षांचा सुरू कमी अधीक प्रमाणात सारखाच होता. सध्या महागाई , बेरोजगारी वाढली असून, शेतीपूरक व्यवसायाचा अभाव आहे. भ्रष्टाचार वाढला असून, पैशाशिवाय कोणतेही काम होत नाही. त्यामुळे निवडून दिलेले सरकार पारदर्शक असले पाहिजे. शेतकरी, शेतमजुरांसह सर्वसामान्यांचे हित साधणारे सरकार सत्तेत आले पाहिजे, असे मत अकोल्यातील बंडू भिरड यांनी व्यक्त केले. निवडणुकीत जनतेने निवडून दिलेल्या सरकारने गोरगरिबांच्या हिताचे काम केले पाहिजे, असे सुकळी येथील निशा काठोळे यांनी सांगितले. निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचे जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष होते. अपेक्षेच्या तुलनेत अकोल्याचा विकास होणे बाकी आहे. त्यामुळे विकासाला गती देणारे आणि सर्वसामान्यांची कामे करणारे सरकार सत्तेत असले पाहिजे, असे मत ईश्वर दुधांडे यांनी व्यक्त केले. तर सर्वसामान्यांची कामे करणारा आणि समस्यांची जाण असणारा लोकप्रतिनिधी निवडून देण्याची आवश्यकता संतोष लोखंडे यांनी व्यक्त केली. जिल्ह्यातील रस्ते, पिण्याचे पाणी, बेरोजगारी इत्यादी प्रमुख समस्या असून, समस्यांची जाण असणारा आणि त्यासंदर्भात उपाययोजनांसाठी धडपडणारा लोकप्रतिनिधी निवडून दिला पाहिजे, असे मूर्तिजापूरच्या सोनाली तेलंग यांनी सांगितले. देशात चांगले सरकार, काम करणारे असावे, त्यासाठी प्रत्येकाने मतदान करण्याची गरज असल्याचे मत मूर्तिजापूर येथील नितीन कुंडले यांनी व्यक्त केले.जिल्ह्यातील अशा आहेत समस्या !जिल्ह्यात पिण्याचे पाणी, सिंचनाचा अनुशेष, शेतीपूरक व्यवसाय, रोजगार निर्मितीसाठी औद्योगिकीकरणाचा अभाव इत्यादी प्रमुख समस्या असून, यासंदर्भात निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींकडून उपाययोजना होणे अपेक्षित असल्याचे मूर्तिजापूर येथील नितीन कुंडले यांनी सांगितले.

 

टॅग्स :Akolaअकोलाakola-pcअकोलाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक