शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
4
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
5
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
6
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
7
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
8
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
9
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
10
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
11
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
12
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
13
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
14
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
15
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
16
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
17
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
18
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
19
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
20
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट

टेक्सटाइल पार्क होणार केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 12:19 IST

कापूस ते कापड वस्त्रोद्योगांना चालना देण्यासाठी राज्यात ५११ प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले होते.

- राजरत्न सिरसाट  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात टेक्सटाइल पार्कची उभारणी करण्यासाठीचे नियोजन केले. जागा पाहणी झाली; पण अद्याप पार्क झाला नसल्याने विधिमंडळ अधिवेशनात स्थानिक लोकप्रतिनिधी या प्रश्नावर काय चर्चा करतात याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.विदर्भातील वºहाड या मागासलेल्या प्रांताची अर्थव्यस्था कृषीवर अवलंबून आहे. पाच जिल्ह्यांचा विस्तार असलेल्या भागातील अकोला तीन जिल्ह्यांच्या केंद्रस्थानी आहे. नागपूरनतंर येथील औद्योगिक वसाहत दुसºया क्रमाकांची विस्तीर्ण अशी आहे. कापसाचे उत्पादनही या भागात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. अकोला येथे पार्क उभारण्यासाठीची जागा, दळणवळणाची व्यवस्था आहे. असे असतानाही याकडे का दुर्लक्ष होत आहे, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. कापूस ते कापड वस्त्रोद्योगांना चालना देण्यासाठी राज्यात ५११ प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले होते. विदर्भात ५९ प्रकल्पांची उभारणी नियोजन होते. या सर्व प्रकल्पांसाठी विदर्भात साडेचार हजार कोटी गुंतवणूक करू न राज्यात ११ लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. यात अकोल्यातील टेक्सटाइल पार्कचा समावेश आहे.विदर्भात कापूसपट्ट्याचा विकासच ‘कापूस ते कापड’ या साखळी धोरणावर झाला आहे. तथापि, या धोरणाकडे दुर्लक्ष झाल्याने आजमितीस कापूस उत्पादनावर आधारित उद्योग मोडकळीस आले असून, कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. या पृष्ठभूमीवर वस्त्रोद्योगांना चालना देण्यासाठी २०११ पासून राबविलेल्या धोरणांची अंमलबजावणी करण्यावर तत्कालीन राज्य शासनाने भर दिला. यात वस्त्रोद्योगांच्या नवीन प्रकल्पांसाठी सूतगिरण्या, गारमेंट्स, जिनिंग-प्रेसिंग तसेच प्रोसेसिंग प्रकल्प उभारणी व बळकटीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले. विदर्भात ११ जिल्ह्यांत वस्त्रोद्योगांचे जाळे विणून पाच लाख नवीन रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. राज्य शासनाच्या वस्त्रोद्योग संचालनालयाने २०११ ते २०१७ या पाच वर्षांकरिता हे धोरण पुन्हा पुढे वाढविण्यात आले. यासाठी वस्त्रोद्योग संचालनालय परिसंवादाच्या माध्यमातून उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रशिक्षणही घेण्यात आले; परंतु यातील किती प्रकल्प उभे झाले, हा प्रश्न आहे.सोमवार, १६ डिसेंबरपासून विधीमंडळ अधिवेशन नागपूर येथे आहे.स्थानिक लोकप्रतिनिधी याबाबत काय प्रश्न विचारतात याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :AkolaअकोलाTextile Industryवस्त्रोद्योग