शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘कॉमन मॅन’ म्हणून जिल्हाधिकारी-सीईओ एसटी बसने प्रवास करतात तेव्हा..!

By admin | Updated: March 3, 2016 02:21 IST

प्रवाशांसोबत साधला संवाद ; अडचणी समजून घेतल्या

संतोष येलकर / अकोलाजिल्हाधिकारी जी.श्रीकांत आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) एम.देवेंदर सिंह यांनी सर्वसाधारण नागरिक (कॉमन मॅन) म्हणून बुधवारी पातूर ते अकोला एसटी बसमधून प्रवास केला. बसमधील प्रवाशांसोबत संवाद साधून, प्रवास करताना येणार्‍या अडचणी त्यांनी समजून घेतल्या.पातूर तालुक्यातील सुवर्णा नदीची पाहणी करण्यासाठी आणि पातूर येथे आयोजित अधिकार्‍यांच्या आढावा बैठकीसाठी बुधवारी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एम.देवेंदर सिंह गेले होते. सायंकाळी अकोल्यात परतताना जिल्हाधिकारी व ह्यसीईओंह्णनी पातूर ते अकोला थेट राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसमधून प्रवास केला. रात्री ८ वाजताच्या सुमारास एसटी अकोल्यातील गीतानगर भागात जिल्हाधिकारी व सीईओ एसटी बसमधून उतरले. सर्वसामान्य नागरिक म्हणून त्यांनी एसटी बसमधून प्रवास केला. पातूर ते अकोला प्रवासादरम्यान जिल्हाधिकारी व सीईओंनी बसमधील प्रवाशांसोबत विविध मुद्यांवर चर्चा केली. तसेच बसमधून प्रवास करताना येणार्‍या अडचणी त्यांनी प्रवाशांकडून समजून घेतल्या. बसच्या चालक व वाहकांसोबतही त्यांनी चर्चा केली. जिल्ह्यातील विकासाच्या मुद्यावरही त्यांनी बसमधील प्रवाशांसोबत संवाद साधला असता, जिल्ह्यात चांगलं काम सुरू असल्याचे बसमधील प्रवाशांनी जिल्हाधिकार्‍यांना सांगितले. बसमधील साफसफाईची पाहणी केली असता, बसमध्ये स्वच्छता आढळून आली, असे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.