शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘सीएचबी’ प्राध्यापकांना मानधन केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 15:47 IST

शिक्षण सहसंचालक कार्यालयाच्या ढिसाळ कारभारामुळे ‘सीएचबी’ प्राध्यापक मानधनापासून वंचित आहेत.

अकोला : तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना गतवर्षीचे मानधन मिळाले नाही. त्यामुळे या शिक्षकांची दिवाळी अंधारातच गेली. सहा कोटींचे अनुदान मानधनासाठी आले असताना येथील उच्च व शिक्षण सहसंचालक कार्यालयाच्या ढिसाळ कारभारामुळे ‘सीएचबी’ प्राध्यापक मानधनापासून वंचित आहेत.उच्च शिक्षण घेऊनही शिक्षकांची नोकरी नाही. तासिका तत्त्वावर मिळणाऱ्या मानधनातून सीएचबी शिक्षक कसेबसे उदरनिर्वाह करीत आहेत. राज्य शासनाने १४ नोव्हेंबर २०१८ रोजी आदेशानुसार, सीएचबी प्राध्यापकांना महिन्याकाठी १५ हजार रुपये मानधनाचा निर्णय घेतला आहे; मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही, असा आक्षेप सीएचबी प्राध्यापकांनी नोंदविला आहे. विभागातील १५२ महाविद्यालयांत सीएचबी प्राध्यापकांची नियुक्ती केली आहे. २०१८-१९ मधील सीएचबी प्राध्यापकांच्या थकीत मानधनासाठी सहा कोटी रुपये शासनाने पाठविले; परंतु नियोजनाअभावी ही रक्कम दिवाळीत मिळाली नाही. तत्कालीन सहसंचालक संजय जगताप यांनी आॅगस्टपूर्वी मानधन दिले जाईल, असे आश्वासन दिले होते; परंतु मध्यंतरी जगताप यांची बदली झाली आणि मानधनाचा विषय रखडला. अद्यापही ६८ महाविद्यालयांच्या सीएचबी प्राध्यापकांचे मानधन प्रलंबित आहे.या कादगपत्रांची होईल तपासणी!संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत ६८ महाविद्यालयांमध्ये कार्यरत सीएचबी प्राध्यापकांचे मानधन अद्यापही देण्यात आले नाही. तांत्रिक त्रुटींमुळे संबंधित प्राध्यापकांच्या कागदपत्रांची पुन्हा तपासणी होणार आहे. उच्च व शिक्षण सहसंचालक कार्यालयातून कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर सीएचबी प्राध्यापकांचे प्रलंबित मानधन दिले जाणार असल्याची माहिती आहे.चालू शैक्षणिक वर्षातील सीएचबी प्राध्यापकांच्या मानधनाचे प्रस्ताव प्राप्त झाले नाहीत; मात्र गतवर्षीचे ८२ महाविद्यालयांतील सीएचबी प्राध्यापकांचे मानधन प्राचार्यांच्या खात्यात जमा झाले आहे. ६८ महाविद्यालयांतील प्राध्यापकांचे मानधन तांत्रिक कारणांनी रोखले आहेत. ते लवकरच अदा करण्यात येईल.- केशव तुपे, प्रभारी सहसंचालक, उच्च व शिक्षण विभाग, अमरावती.

 

टॅग्स :AkolaअकोलाProfessorप्राध्यापकEducation Sectorशिक्षण क्षेत्र