शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळग्रस्त शेतक-यांना मदतीचे ‘कवच’ केव्हा?

By admin | Updated: May 28, 2016 02:00 IST

जिल्ह्यात ९४२ गावांतील शेतकर्‍यांना सरकारी मदतीची प्रतीक्षा.

संतोष येलकर / अकोलाजिल्ह्यातील लागवडयोग्य सर्व गावे दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आली असली तरी दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी शासनामार्फत अद्यापही मदत जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे दुष्काळाने होरपळलेल्या जिल्ह्यातील शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी सरकारच्या दुष्काळी मदतीचे कवच केव्हा मिळणार, याबाबत जिल्ह्यातील ९४२ गावांमधील दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांकडून प्रतीक्षा केली जात आहे.गतवर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. खरीप हंगामातील नजरअंदाज पैसेवारीच्या आधारे जिल्ह्यातील लागवडयोग्य ९९७ गावांपैकी ५0 पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेली ५५ गावे शासनामार्फत गत ऑक्टोबरमध्ये दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आली. या गावांमधील दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी मदतदेखील प्राप्त झाली आहे. त्यानंतर शासनाच्या गत २३ मार्च रोजीच्या निर्णयानुसार, सुधारित व अंतिम पैसेवारीच्या आधारे ५0 पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेली जिल्ह्यातील सातही तालुक्यांतील लागवडयोग्य सर्व ९९७ गावे दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आली. दुष्काळ जाहीर होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला; मात्र दुष्काळग्रस्त गावांमधील शेतकर्‍यांसाठी शासनामार्फत अद्यापही मदत जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे दुष्काळग्रस्त ९४२ गावांमधील शेतकरी अद्याप सरकारच्या दुष्काळी मदतीपासून वंचित आहेत. सतत तीन वर्षांपासूनची नापिकी आणि दुष्काळी परिस्थितीने शेतकरी हवालदिल झाला आहे. दुष्काळाने होरपळणार्‍या शेतकर्‍यांकडे पैसा नाही. त्यामुळे येत्या खरीप हंगामात शेतीची मशागत आणि पेरणीचा खर्च कसा भागविणार, याबाबतची चिंता शेतकर्‍यांना सतावत आहे. त्याअनुषंगाने सरकारची दुष्काळी मदत केव्हा मिळणार, याबाबतची प्रतीक्षा जिल्ह्यातील ९४२ गावांमधील शेतकर्‍यांकडून केली जात आहे.