शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

तुमचे आमचे नाते काय.. जय जिजाऊ, जय शिवराय!

By admin | Updated: February 20, 2016 02:36 IST

छत्रपती शिवरायांच्या जयघोषात निघाली शोभायात्रा.

अकोला: ढोलताशांचा गजर.. आकाशात भिरभिरणार्‍या भगव्या पताका.. ह्यतुमचे आमचे नाते काय.. जय जिजाऊ, जय शिवराय!ह्ण चा जयघोष अन् ढोल-ताशे, दिंडी अन् गोंधळ, संबळाच्या तालावर थिरकरणारी, भगवे फेटे परिधान केलेली तरुणाई.. महिला भगिनी.. हे चित्र अवघ्या अकोलेकरांचे लक्ष वेधून घेत होते. निमित्त होते, बहुजनांचा राजा, श्रीमंत योगी छत्रपती शिवरायाच्या जन्मदिनाचे. शिवरायांच्या स्वागताला जणू शिवशाहीच अवतरली, अशा थाटात छत्रपतींची शोभायात्रा शुक्रवार, १९ फेब्रुवारी रोजी शहरातून निघाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने जल्लोषात शोभायात्रा काढली. शिवाजी पार्कमधील छत्रपती शिवरायांच्या अश्‍वारूढ पुतळय़ाला मानाचा मुजरा करून शोभायात्रेची सुरुवात झाली. पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, महापौर उज्ज्वला देशमुख यांनी छत्रपती शिवरायांचे पूजन केले. शोभायात्रेमध्ये सजलेले अश्‍व, गोंधळ, संबळाच्या तालावर नाचणारे गोंधळी, अश्‍वारूढ रथात विराजमान झालेले प्रतिकात्मक शिवराय, भगव्या पताका खांद्यावर घेऊन ढोलताशांच्या गजरावर बेधुंद होऊन नाचणारे युवक, ढोलताशांवर थाप देऊन गजर करणारे संकल्प प्रतिष्ठानचे युवक हे सर्व लक्षवेधक होते. दिमाखात निघालेल्या छत्रपती शिवराजेंच्या शोभायात्रेतील देखणा सोहळा पाहण्यासाठी अकोलेकर नागरिकांनी रस्त्याच्यावर दुतर्फा मोठी गर्दी केली होती. चौकाचौकांमध्ये शोभायात्रेचे स्वागत करण्यात येत होते. पुष्पांची उधळण करीत, भगवे फेटे परिधान करून शोभायात्रेत सहभागी झालेल्या भगिनी, युवक, सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे पदाधिकारी लक्ष वेधून घेत होते.