शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या पिकाचे नाचगाण्याने स्वागत

By admin | Updated: April 12, 2016 01:29 IST

खामगाव तालुक्यातील पिंप्री धनगर येथे तीन दशकानंतर झाली बागायती शेती.

खामगाव (जि. बुलडाणा): खामगाव तालुक्यातील पिंप्री धनगर येथे तब्बल ३२ वर्षांनंतर यावर्षी पहिल्यादांच सिंचन करून बागायती शेती करण्यात आली. या पहिल्या पिकाचे येथील शेतकर्‍यांनी बंजारा शैलीत नाचगाण्याने स्वागत केले.मन प्रकल्पामुळे पिंप्री धनगर येथील अनेक शेतकर्‍यांची बागायती शेती गेली होती. १९८७-८८ साली या गावाचे पुनर्वसन माळरानावर करण्यात आले. प्रकल्पामध्ये शेती गेल्याने अनेकांवर बेरोजगारांची कुर्‍हाड कोसळली होती. प्रकल्पासाठी शेती गेली, पण शेतीसाठी प्रकल्पाचे पाणीही मिळत नसल्याने शेतकर्‍यांनी तब्बल तीन दशकं लढा दिला. यावर्षी पहिल्यादांच जलाशयाचे पाणी मिळाल्याने शेतकर्‍यांनी कांदा, भुईमुग आणि इतर पिके घेतली. त्यापैकी काही पिकं हाती आल्यानंतर या शेतकर्‍यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. बंजाराबहुल लोकवस्ती असलेल्या या गावात पहिल्या पिकाचे शेतकर्‍यांनी वाजत-गाजत उत्साहात स्वागत केले. पाण्यासाठी दिलेल्या लढय़ामध्ये मदत करणार्‍या प्रत्येक व्यक्तीचा यावेळी गावकर्‍यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी उपकार्यकारी अभियंता आर.एस.जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते देवेंद्र देशमुख, सुनील जाधव, प्रतापराव राठोड, तेजराव नहार, संतोष राठोड, सरपंच आशाताई जाधव यांचाही सत्कार यावेळी गावकर्‍यांच्यावतीने करण्यात आला.