लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: राष्ट्रपतिपदासाठी भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)कडून सध्याचे बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर अकोल्यात भाजपा कार्यकर्त्यांनी व कोळी समाजाच्या भाजपा कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला.जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, महापौर विजय अग्रवाल, महानगर अध्यक्ष किशोर मांगटे पाटील, उपमहापौर वैशाली शेळके, स्थायी समिती सभापती बाळ टाले, गीतांजली शेगोकार, तालुका अध्यक्ष अनिल गावंडे यांच्या नेतृत्वाखाली डॉ. विनोद बोर्डे, गणेश अंधारे, प्रवीण हगवणे, जयकृष्ण ठोकळ, राजेश घावत, भास्कर बोपटे, वसंत गावंडे, संजय जिरापुरे, विवेक भरणे , शिवानंद तराळे, अंबादास उमाळे, संजय गावंडे, भानुदास भटकर, नीलेश बोर्डे, प्रा. अनुप शर्मा, अनुप गोसावी, नरेंद्र वक्ते, रामभाऊ गावंडे, सतीश गावंडे, विजय तेलगोटे, श्याम पकधुने, देवेंद्र देवर, विद्याधर काकड, बबलू पळसपगार आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
राष्ट्रपती उमेदवार निवडीचे अकोला भाजपकडून स्वागत
By admin | Updated: June 20, 2017 04:51 IST