शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

वजनात अशीही बनवाबनवी!

By admin | Updated: October 14, 2016 02:12 IST

ग्राहकांनो, जागे व्हा; स्नॅक्स पाऊचमध्ये छापील वजनापेक्षा कमी वजनाचे पदार्थ.

अकोला, दि. १३- नामांकित कंपन्यांची अनेक प्रकारची खाद्यपदार्थांंची पाकिटे दुकानांवर मिळतात; परंतु या पाकिटांवर दिलेले वजन आणि पाकिटात असलेल्या खाद्यपदार्थांंंच्या वजनात तूट असल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी दुपारी दिसून आला. लोकमत चमूने काही नामांकित आणि प्रचलित कंपन्यांच्या खाद्यपदार्थांंंची पाकिटे दुकानावरून घेतली आणि पाकिटांमधील खाद्यपदार्थ दुकानातील इलेक्ट्रॉनिक काट्यावर मोजली. प्रत्यक्षात अनेक पाकिटांमध्ये खाद्यपदार्थांंंचे वजन कमी असल्याचे दिसून आले. एका किलोमागे ग्राहकांची किती लुबाडणूक या कंपन्यांकडून होत असल्याचा धक्कादायक प्रकार लोकमत चमूने केलेल्या स्टिंग ऑपरेशमधून उघडकीस आला. कंपन्यांकडून ग्राहकांसोबत कशी बनवाबनवी केली जाते, हेच यातून स्पष्ट झाले. आपल्याकडून वस्तू खरेदी करणारा ग्राहक म्हणजे राजा; मात्र या ग्राहक राजाची सर्रास फसवणूक केली होते. दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंसाठी प्रत्येकाला कोणत्या तरी व्यापारी, कंपन्यांकडून खरेदी करावी लागते. खरेदी केलेल्या वस्तू अनेकदा खराब निघतात किंवा वजनात तूट तरी दिसून येते. वस्तू खरेदी करताना आपण उत्पादनाची एक्सपायरी डेट, वजन तपासून पाहिले का, पदार्थात भेसळ आढळली का आणि आढळल्यास तक्रार करतो का, याचे उत्तर शेकडो ग्राहकांकडून नकारार्थीच येईल. दुकानातून वस्तू, खाद्यपदार्थ घेताना, ग्राहक त्यावरील केवळ एक्सपायरी डेट पाहतो; परंतु वस्तू, खाद्यपदार्थाचे वजन कधीच पाहत नाही. नामांकित कंपन्याची नावे पाहून तो डोळे मिटून खाद्यपदार्थांंंची पाकिटे विकत घेतो. ग्राहक वजन विचारत नसल्याने, कंपन्यांनी ग्राहकांसोबत सर्रास बनवाबनवी सुरू केली आहे. कंपन्यांची ही बनवाबनवी ग्राहकराजासमोर उघड व्हावी. या दृष्टिकोनातून लोकमत चमूने शुक्रवारी स्टिंग ऑपरेशन केले. स्टिंगदरम्यान इलेक्ट्रॉनिक काट्यावर खाद्यपदार्थांंंचे पाकिटांचे वजन मोजले असता, बर्‍याच पाकिटांमधील खाद्यपदार्थ आणि पाकिटावरील छापील वजनात मोठी तूट दिसून आली. २५ ग्रॅम, ५0 ग्रॅम खाद्यपदार्थांंंच्या वजनाचा हिशोब केल्यास किलोमागे २५ ते ४ 0 ग्रॅमची तूट आढळून येते. छापील वजनाची बनवाबनवी करून कंपन्या ग्राहकांची कशी फसवणूक करीत आहेत. हे यातून साफ उघड झाले. लाचखोर आरोग्य निरीक्षक निलंबित!अकोला : शौचालय बांधकामाच्या अनुदानासाठी सकारात्मक अहवाल पाठविण्यास अडीच हजार रुपयांची लाच स्वीकारणारा मनपाचा लाचखोर आरोग्य निरीक्षक रोशन अली याला निलंबित करण्याची कारवाई गुरुवारी महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी केली. आयुक्तांच्या तडकाफडकी निर्णयामुळे कामचुकार आरोग्य निरीक्षकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.गंगा नगरातील रहिवासी रोशन अली रज्जाक अली हा मनपामध्ये आरोग्य निरीक्षक पदावर कार्यरत आहे. त्याने शौचालय बांधकामाच्या अनुदानासाठी अनुकूल अहवाल पाठविण्यास घर मालकास अडीच हजार रुपयांची लाच मागितली. १0 ऑक्टोबर रोजी लाचलुचपत प्रतिबंध पथकाने त्याला लाच स्वीकारताना अटक केली. ११ ऑक्टोबर रोजी रोशन अली याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता मनपा आयुक्त अजय लहाने यांनी रोशन अली याला निलंबित केले.न्यायालयातून जामीन नाहीरोशन अली याने जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला. या अर्जावर गुरुवारी प्रथम जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.जी. वाघमारे यांच्या न्यायालयात सुनावणी झाली; परंतु न्यायालयाने जामिनावर अद्यापपर्यंंंत निर्णय दिला नाही, हे विशेष.