शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आठवडी बाजाराची उलाढाल निम्यावर!

By admin | Updated: November 14, 2016 03:09 IST

सुट्या पैशांची चणचण; भाज्या, फळे, किराणा मालास उठावच नाही, रविवारीही बाजारात शुकशुकाटच.

अकोला, दि. १३- चलनातून हजार व पाचशेच्या जुन्या नोटा एका फटक्यात बाद झाल्यानंतर निर्माण झालेल्या कृत्रिम आर्थिक पोकळीचा परिणाम व्यापार-व्यवसायावर दिसून येत आहे. अकोला शहरातील सर्वच व्यवहार जवळपास ठप्प झाले असताना रविवारचा आठवडी बाजारही त्यातून सुटला नाही. सुट्या पैशांअभावी ग्राहकांनी बाजाराकडे पाठ केली. त्यामुळे बाजारातील भाज्या, फळं व किराणा व्यावसायिकांचा धंदा निम्म्यावर आल्याचे चित्र रविवारी दिसून आले.शहरात जनता बाजार, जुना भाजी बाजार, जठारपेठ चौक, सिंधी कॅम्प यासह इतर ठिकाणी दररोज भाजी बाजार भरतो; परंतु रविवारी जनता बाजारात आठवडी बाजार भरतो. या बाजारात शहरासह जिल्हाभरातील ग्राहकांची मोठी गर्दी होऊन लाखो रुपयांची उलाढाल होते. चलनातून हजार व पाचशेच्या नोटा बाद झाल्यानंतर नागरिकांकडे पुरेशा प्रमाणात नवीन नोटा उपलब्ध झालेल्या नसतानाच शंभर व पन्नासच्या नोटांचाही मोठा तुटवडा निर्माण झाल्याचा परिणाम रविवारच्या बाजारावर दिसून आला. एरवी ग्राहकांनी फुलून जाणार्‍या या बाजारात गत आठवड्याच्या तुलनेत ग्राहकांची संख्या खूपच कमी होती. सध्या हिवाळा असल्यामुळे भाज्यांची आवक वाढल्याने किमती आटोक्यात आहेत. २0 ते ३0 रुपये किलो दराने भाज्या मिळत असतानाही केवळ सुट्या पैशांअभावी ग्राहकांकडून भाज्यांची खरेदी होत नसल्याने दररोज होणारा ८ ते १0 हजारांचा धंदा आता केवळ ४ ते ६ हजार रुपयांपर्यंत घसरल्याचे भाजी विक्रेत्यांनी सांगितले.