शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

बचत गटातून साधला उन्नतीचा मार्ग!

By admin | Updated: April 24, 2017 01:59 IST

स्वयंरोजगाराची धरली कास: गोपालखेडच्या युवकांनी केली बेरोजगारावर मात

अतुल जयस्वाल - अकोलागावात राहून काय करायचे, ना रोजगाराची साधने, ना शिक्षणाच्या संधी, अशी नकारात्मक भावना असलेले अनेक युवक गाव सोडून रोजगारासाठी शहराचा रस्ता धरतात. अकोला जिल्ह्यातील गोपालखेड या छोट्याशा गावातील काही युवकांनी मात्र बचत गटाच्या माध्यमातून एकत्र येऊन स्वयंरोजगाराची कास धरत बेरोजगारीवर मात केली आहे.अकोल्यापासून २० कि.मी. अंतरावर गोपालखेड हे छोटेसे गाव आहे. खारपाणपट्ट्यात असलेल्या या गावाची अर्थव्यवस्था शेतीवर आधारित आहे. शेतीव्यतिरिक्त रोजगाराचे इतर कोणतेही साधन नसल्यामुळे गावातील अनेक तरुण रोजगारासाठी अकोला व इतर मोठ्या शहरांमध्ये कार्यरत आहेत. शेतीला जोडधंदा म्हणून गावातील काही सुशिक्षित तरुणांनी २००९ मध्ये एकत्र येऊन संघर्ष स्वयं सहायता बचत गटाची स्थापना केली. काही वर्षे बचत गट सुरळीत चालू राहिल्यानंतर या युवकांनी बचत गटाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराची कास धरण्याचा निर्धार केला. त्यांच्या निर्धाराला साथ लाभली कृषी समृद्धी प्रकल्पाची. या प्रकल्पाद्वारे ३० टक्के अनुदान घेऊन बचत गटातील अजय मोडक, गोपाल मोडक, विजय देशमुख, अमोल पिसे व सुरेश कौलकार यांनी आपल्या हिश्शाची रक्कम भरून मागच्या वर्षी दोन लाख रुपयांत मिनी दाल मिल सुरू केला. या भागात तुरीचे उत्पादन चांगले होत असल्यामुळे त्यांच्या दाल मिलला चांगला प्रतिसाद मिळू लागला. आसपासच्या गावांमधील शेतकऱ्यांनीही बचत गटाच्या दाल मिलमधून तूर डाळ तयार करून घेण्यास सुरुवात केली. पहिल्या वर्षी बचत गटाच्या मिलमध्ये ५० क्विंटल तूर डाळीवर प्रक्रिया करण्यात आली. यावर्षी आतापर्यंत जवळपास १०० क्विंटल तूर डाळीवर प्रक्रिया करण्यात आली असून, अजूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. या उद्योगातून बचत गट भरभराटीस आला असून, या तरुणांनी बेरोजगारीवर मात करीत रोजगार मिळविला आहे. गुळपट्टी, शेवयांचीही विक्रीबचत गटातील सदस्यांनी गुळपट्टी आणि सेवया तयार करण्याचा गृहोद्योगही सुरू केला आहे. बचत गटातील प्रवीण मोडक, प्रफुल्ल मोडक, अजय मोडक, विजय देशमुख हे चार सदस्य २०१३ पासून सेवया तयार करीत आहेत. या सेवयांना चांगली मागणी असून, गतवर्षी त्यांनी ४० हजार रुपयांच्या मालाची विक्री केली, तसेच बचत गटातील सदस्य कृषी प्रदर्शन व इतर प्रदर्शनांमध्ये गुळपट्टीची विक्री करून बचत गटाला आर्थिक हातभार लावतात.