शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
4
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
5
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
6
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
7
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
8
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन फेका
9
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
10
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
11
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
12
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
13
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
14
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
15
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
16
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
17
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
18
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
19
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
20
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण

डवरणीचे काम सोपे

By admin | Updated: August 21, 2014 22:45 IST

२४ अश्‍वशक्तीच्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने डवरणीचे तंत्र विकसीत करुन अत्यंत सोपे व कमी वेळात

मंगरूळपीर: शेतीपिकातील तणाच्या वाढत्या प्रस्थाला आवर घालण्यासाठी डवरणीचे कामाला लागणारा भरमसाठ वेळ पाहता तणाच्या नायनाटासाठी तणनाशक आले. परंतू आपल्या कल्पकतेतून चक्क छोट्या २४ अश्‍वशक्तीच्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने डवरणीचे तंत्र विकसीत करुन पिकाला पोषक ठरणार्‍या डवरणीचे काम चिखली येथील सचिन चौधरीने अत्यंत सोपे व कमी वेळात जास्त शेतीक्षेत्र व्यापण्याचे करुन टाकले आहे.आपल्या कृषी संस्कृतीनुसार शेतीकामात नांगरणी, वखरणी, डवरणी, अन् निंदन हे सर्वात महत्वाचे. कधी काळी शेतात पेरणीच्या गडबडीनंतर वर आलेल्या पिकाची डवरणी करण्याकरिता शेतकर्‍यांची मोठी गडबड असायची. शेतात झालेल्या तनाचा नायनाट करण्यासाठी डवरणी महत्वाची. दोन बैलाच्या खांद्यावर शिवळाट त्यावर बांधलेले दोन डवरे. डवरे धरण्यासाठी दोन डवरेकरी. पण आता काळ बदला आहे. आणी शेतीच रूपही. कमी वेळात आणी कमी पैशात शेती करण्यासाठी अनेक प्रयोग,संशोधन झाली. यातील बरेच प्रयोग संशोधकांनी केले. त्यातुन बर्‍याचशा कृषी अवजारे, आणी कृषी साहित्यांनी जन्म घेतला. आपल्या अनुभवातून केलेल्या प्रयोगाच्या माध्यमातून अशा प्रकार आधूनिकतेची कास धरत शेतकर्‍यांनी तयार केलेले शेतीपयोगी यंत्र वा तंत्र विकसीत करणार्‍या बर्‍याच शेतकर्‍यांचे शिक्षण तसे नावालाच. मात्र प्रतिभेच्या जोरावर यातील अनेकांनी कृषी क्षेत्राला आपल्या संशोधनाची दखल घ्यायला भाग पाडले व इतिहास घडविला. या सर्व चर्चेवरुन ह्यथ्री इडिएटह्ण या चित्रपटातील रॅन्चो हे पात्र तुम्हाला आठवले असेलच. नेहमी नाविन्याचा शोध घेणारा. तसाच रॅन्चो मंगरूळपीर तालुक्यातील ङ्म्रीक्षेत्र चिखली या गावात सचिन अनिरूध्द्र चौधरी च्या रुपाने समोर आलाय. त्यांनी छोट्या ट्रॅक्टरवच्या मदतीने एकाच वेळी १0 डवर्‍यांनी शेतीपिकाची डवरणी करण्याचा प्रयोग आपल्या बुध्दीचातूर्याच्या बळावर यशस्वी केला. त्यांच्या या प्रयोगामुळे अवघ्या ५ तासात २0 एकर डवरणी करून घंटो का काम मिनटो मे करून दाखविले. त्यांच्या यशस्वी प्रयोगाचे कौतुक करावे तेवढे थोडेच-- २२ इंचात सोयाबीनची पेरणी केल्या शेतात छोट्या ट्रक्टरवर विकसीत केलेल्या प्रयोगाच्या सहायाने डवरणीचे काम केले. धूर्‍यावर मोठय़ा प्रमाणात झाडे झूडपे असल्यास डवरणीत अडचण येते. परंतू ज्या ठिकाणी शेताचा धूरा हा झाडांनी वेढलेला असतो त्या ठिकाणी काही अडचणी येतात. सोबतच शेतातील आडतासात अशा पध्दतीने डवरणी करण्यासाठी पिक नको.** असे आहे सचिनचे तंत्रएका छोट्या ट्रॅक्टरला फाउंडेशन तयार करून त्यावर जवळपास २४ फुटाची दांडी बांधुन त्यावरती १0 डवर्‍याची जोडणी केली. त्यांनतर पहिल्या गेअरमध्ये ट्रक्टर चालविला जातो. सोमवारी दुपारी १२ वाजताचे सुमारास प्रयोगाचे प्रात्यक्षिक सुरू झाले. अन् ते यशस्वी ठरले. दिवसभरात एका तासाचा ब्रेक वगळता सांयकाळी ६ वाजेपर्यंत ५ तासात २0 एकराची डवरणी पुर्ण केली. ** असा आला खर्चदूपारी १२ ते सायंकाळी ५ या पाच तासात आपल्या प्रयोगातून सचिन चौधरी यांनी २0 एकर शेतातील डवरणी केली. पाच तासात त्यांना तासी दीड लिटर प्रमाणे साडेसात लिटर डिझल लागले. त्याचे ढोबळमानाने ४७२ रुपये . दहा शेतमजूरांचे प्रत्येकी शंभर रुपये प्रमाणे दिवसाचे एक हजार अशा १ हजार ४७२ रुपयांमध्ये चौधरी यांनी तब्बल २0 एकरातील सोयाबीनच्या पिकाची डवरणी केली.