शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्याचे टरबूज-खरबूजही जाणार आखाती देशात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 18:07 IST

अकोला: जिल्ह्यातील केळी, डाळिंब, भेंडी, मिरचीपाठोपाठ तेल्हारा आणि पातूर तालुक्यातील टरबूज व खरबूजही आखाती देशात जाणार आहे. टरबूज आणि खरबूज निर्यातीचा निर्यातदार कंपनीसोबत लवकरच करारनामा करण्यात येणार आहे.

- संतोष येलकर

अकोला: जिल्ह्यातील केळी, डाळिंब, भेंडी, मिरचीपाठोपाठ तेल्हारा आणि पातूर तालुक्यातील टरबूज व खरबूजही आखाती देशात जाणार आहे. टरबूज आणि खरबूज निर्यातीचा निर्यातदार कंपनीसोबत लवकरच करारनामा करण्यात येणार आहे.जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा तसेच शेतकºयांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या पुढाकारात जिल्ह्यातील भाजीपाला आणि फळपिकांच्या निर्यातीचा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने गतवर्षीपासून जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील केळी आखाती देशात निर्यात करण्यात येत आहे. त्यानंतर जिल्ह्यातील डाळिंब, भेंडी आणि मिरचीची निर्यात सुरू करण्यात आली. त्या पाठोपाठ आता जिल्ह्यातील तेल्हारा व पातूर या दोेन तालुक्यातील टरबूज आणि खरबुजाची निर्यात दुबई, अबुधाबी, बहरीन, मस्कत इत्यादी आखाती देशांत करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासन, ‘अपेडा’च्या पुढाकारात मोर्णा व्हॅली कंपनीचा बॉम्बे एक्सपोर्ट कंपनीसोबत लवकरच करारनामा करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने आता अकोला जिल्ह्यातील टरबूज व खरबूजही आखाती देशांत जाणार आहे.पातूर-तेल्हारा तालुक्यात १५० हेक्टरवर टरबूज-खरबुजाची लागवड!टरबूज-खरबुजाची आखाती देशात निर्यात करण्यासाठी जिल्ह्यातील पातूर व तेल्हारा या दोन तालुक्यात १५० हेक्टर क्षेत्रावर टरबूज व खरबूज लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये पातूर तालुक्यातील चान्नी, पिंपळखुटा व उमरा आणि तेल्हारा तालुक्यात चितलवाडी, हिवरखेड, दहिगाव अवताडे इत्यादी गावांत १५ नोव्हेंबरपर्यंत टरबूज व खरबुजाची लागवड करण्यात येणार आहे.जिल्ह्यातील शेतकºयांच्या शेतमालाला योग्य भाव उपलब्ध व्हावा आणि उत्पन्न वाढावे, यासाठी जिल्ह्यातील फळे-भाजीपाला निर्यातीचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील टरबूज व खरबूज निर्यातीचे नियोजन करण्यात आले आहे. निर्यातीद्वारे शेतमालाला चांगला भाव मिळणार असल्याने, त्याचा शेतकºयांना फायदा होणार आहे.-आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हाधिकारीजिल्ह्यातील केळी, डाळिंब, भेंडी व मिरचीची निर्यात आखाती देशात सुरू आहे. आता पातूर व तेल्हारा तालुक्यातील टरबूज व खरबुजाची निर्यातही आखाती देशात करण्यात येणार असून, त्यासाठी संबंधित निर्यातदार कंपनीसोबत करारनामा करण्यात येणार आहे.- अशोक अमानकर,  उपजिल्हाधिकारी (रोहयो)

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीAastik Kumar Pandeyआस्तिककुमार पांडेय