शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

अभयारण्यातील पाणवठय़ांवर टँकरद्वारे पाणीपुरवठा

By admin | Updated: April 25, 2016 01:58 IST

मेळघाट व्याघ्र प्रकल्प व काटेपूर्णा अभयारण्यातील श्वापदांना आता कृत्रिम पाणवठय़ांचा आधार.

राम देशपांडे/अकोला अकोला जिल्हय़ातील काटेपूर्णा अभयारण्यातील तथा आकोट तालुक्यातील नरनाळा-मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अनेक नद्या-नाले व तलाव कोरडे पडले आहेत. जंगलातील श्‍वापदांची पाण्याच्या शोधात भटकंती सुरू असून, या परिस्थितीवर मात करण्यासाठी वन विभागाच्यावतीने ठिकठिकाणी तयार करण्यात आलेल्या कृत्रिम पाणवठय़ांमध्ये टँकरद्वारे पाणी सोडले जात आहे. वाढत्या तापमानामुळे दुष्काळाची दाहकता आणखी तीव्र होत चालली आहे. याचे परिणाम मेळघाट आणि काटेपूर्णा अभयारण्यातील श्‍वापदानांसुद्धा भेडसावू लागले आहेत. जिल्हय़ाच्या उत्तरेकडील आकोट तालुक्यातील नरनाळा मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील व जिल्हय़ाच्या दक्षिणेला असलेल्या काटेपूर्णा अभयारण्यातील बहुतांश नद्या, नाले व तलाव कोरडेठण्ण पडले आहेत. दुष्काळाची दाहकता श्‍वापदांनादेखील भेडसावत असल्याने पाण्याच्या शोधात त्यांची वणवण सुरू आहे. दरवर्षी उन्हाळय़ात निर्माण होणारी ही परिस्थिती लाक्षात घेऊन, वन विभागाच्यावतीने मेळघाट आणि नरनाळा अभयारण्यात अनेक ठिकाणी कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत. नैसर्गिक जलस्रोत कमी झाल्याने जनावरे अरण्यालगतच्या गाव खेड्यांकडे वळू लागली आहेत. तहानेने व्याकूळलेल्या श्‍वापदांना पाण्याची कमतरता भासू नये, म्हणून वन्यजीव विभागाच्यावतीने या कृत्रिम पाणवठय़ांमध्ये टँकरद्वारे पाणी टाकण्यात येत आहे. वन विभागाच्या कर्मचार्‍यांनी सुरू केलेली ही मोहीम संपूर्ण मेळघाट व्याघ्र प्रकल्पासह नरनाळा अभयारण्यातदेखील राबविण्यात येत आहे. विशेष बाब म्हणजे, मेळघाट व्याघ्र प्रकल्पात ज्या ठिकाणी टँकरसुद्धा पोहचू शकत नाही, अशा ठिकाणी असलेल्या कृत्रिम पाणवठय़ांजवळ सोलरवर चालणारे हातपंप लावण्यात आले असून, नरनाळय़ाच्या पायथ्याशी असलेल्या कृत्रिम पाणवठय़ांमध्ये किल्ल्यावरील तलावातून पाणी पोहोचविण्यासाठी नैसर्गिक मार्ग तयार करण्यात आले आहेत. यंदाचा उन्हाळा अभयारण्यातील श्‍वापदांना तापदायक ठरू शकतो, याची पूर्वकल्पना असल्याने वन विभागाने श्‍वापदांची तहान भागविण्यासाठी आवश्यक पाऊले उचलली असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली.